देशात अनेकांना खोकला, ताप, अंगदुखी, उलट्यांचं प्रमाण वाढलंय का?

व्हीडिओ कॅप्शन, तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार H3N2 या विषाणूमुळे आजारी पडण्याचं प्रमाण सध्या वाढलं आहे.
देशात अनेकांना खोकला, ताप, अंगदुखी, उलट्यांचं प्रमाण वाढलंय का?
आरोग्य
Published

गेल्या काही दिवसांपासून देशभरात काही लोकांना सतत खोकला, घसा खवखवणं, अंगदुखी, अतिसार, उलट्या आणि मळमळ होण्याचे प्रकार वाढले आहेत. ही लक्षणं आठवडाभर किंवा त्यापेक्षा जास्त दिवस दिसत आहेत. खोकला तर तीन आठवड्यांपर्यंत राहू शकतो, असं IMA म्हणजे इंडियन मेडिकल असोशिएशने जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटलं आहे. तर नॅशनल सेंटर फॉर डीसिज कंट्रोल या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार - ही लक्षणे 'H3N2' या विषाणुमुळे दिसत आहेत.

ही लक्षणे दिसल्यास फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्यावीत आणि अँटिबायोटिक्सचा अतिवापर टाळावा, अशी सूचना IMA ने केली आहे.

हे वाचलंत का?