सोशल : 'सत्तेतून दंगली, दंगलीतून सत्ता हेच भाजपचं राजकारण'

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईतील मुलुंडमध्ये झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेत पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा जातीय दंगली घडवण्याचा उद्योग दिसतो, या टीकेवर बीबीसी मराठीच्या वाचकांनी विविध मतं व्यक्त केली. काही वाचकांनी राज ठाकरे यांचं समर्थन केलं आहे तर काही वाचकांनी ठाकरे यांच्या टीकांत तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
या सभेत ठाकरे यांनी जम्मू-काश्मीरमधील कठुआ इथ झालेल्या बलात्कार प्रकरणावरूनही तीव्र संताप व्यक्त केला. बलात्काऱ्यांच्या मागे भारतीय जनता पक्ष उभा राहत असल्याचा आरोपही त्यांनी केला. "आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींच्या मागे भाजपवाले उभे राहतात, हे भयानक आहे. साडेचार वर्षांत काहीच करता न आल्यामुळे निवडणुकांसाठी सत्ताधाऱ्यांचा देशात जातीय दंगली भडकावण्याचा यामागे उद्योग दिसतो," अशी टीका त्यांनी केली.
ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकांबद्दल बीबीसीने वाचकांना त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या होत्या. यावर वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यातील काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया इथं देत आहोत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
विनायक वरूटे लिहितात, "धार्मिक दंगली पूर्वी होत नव्हत्या का? तर होत होत्या. व्यक्तिगत वा सामूहिक हिंसा, भ्रष्टाचार, बलात्कार, दंगली घडणे किंवा घडवणे ही एक बाब आणि राजसत्तेतल्या पक्षाने घडवणे किंवा अशा घटनांच्या मागे उभं राहाणं ही वेगळी बाब. यावरूनच या सरकारची नियत कळते. त्यामुळे ठाकरे बोलले ते योग्यच आहे."

फोटो स्रोत, Facebook
महादेव सावंत यांनी ट्वीट केलं आहे की, "जे 2014च्या आधी मनमोहन सिंग यांच्या कारभारावर टीका करत होते, त्यांच्याकडे आज स्वतःबद्दल सांगण्यासारखं काहीच नाही. म्हणून हिंदू-मुस्लीम भांडणं लावून देत आहेत."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
चेतन बांगल यांनीही असंच मत व्यक्त केलं आहे. "चार वर्षांत सबका साथ, सबका विकास करू शकले नाहीत. मग आता जाताजाता काही तरी करायचं म्हटल्यावर दंगलीच घडवून जातील कारण ते इतर कामांपेक्षा सोपं असतं."
"दंगलीतून सत्ता, सत्तेतून दंगल हेच भाजपचं राजकारण आहे," असं परखड मत सागर पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
गिरीश तेरेदेसाई म्हणतात, "भाजप काही दंगली वगैरे घडवत नाही. सत्ता मिळत नाही म्हणून काहीही आरोप करण्यापेक्षा मराठी माणसांसाठी आधी काही केलं तर सांगितलं तर चांगलं होईल."

फोटो स्रोत, Facebook
"भाजप सत्तेत आल्यापासून किती दंगली झाल्या? किती बॉम्बस्फोट झाले? उगाच काहीही आरोप केले जात आहेत. भाषिक राजकारण करून किती दंगली तुम्ही केल्या? संपूर्ण महाराष्ट्रभर तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि तुम्हीच लोकांवर दंगली घडवण्याचे आरोप लावताय," असं चेतन बांगल यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
दंगली घडवून सरकारची प्रतिमा काळी झाल्यावर त्यांना कोण मत देईल, असा प्रश्न सचिन शिलंवत यांनी विचारला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)