#5मोठ्याबातम्या : कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पाहूयात आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.
1. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन
महाराष्ट्राचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 67 वर्षांचे होते.
हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांना पहाटे मुंबईतल्या के. जे. सोमय्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, असं भाजप महाराष्ट्र प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
पहाटे 4.32 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी, असा परिवार आहे.
पांडुरंग फुंडकर यांचा जन्म 1950मध्ये बुलडाण्यातल्या खामगाव तालुक्यात झाला. ते पहिल्यांदा 1978 मध्ये आमदार म्हणून निवडून आले. 1985पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासह 1991 ते 1996 या काळात त्यांनी महाराष्ट्र भाजपचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. अकोला लोकसभा मतदार संघातून ते सलग तीन वेळा निवडून आले होते.
8 जुलै 2016 रोजी त्यांनी फडणवीस सरकारमध्ये कृषिमंत्रीपदाची शपथ घेतली होती. सध्या फुंडकर विधानपरिषदेचे आमदार होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1

X पोस्ट समाप्त, 2

X पोस्ट समाप्त, 3
2. पालघर, गोंदिया-भंडाऱ्याचा पोटनिवडणुकीचा निकाल आज

फोटो स्रोत, Getty Images
सोमवारी पार पडलेल्या पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी आज होणार आहे.
पालघरमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेना परस्परांच्या विरोधात लढत आहेत तर भंडाऱ्यात राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांसमोर ठाकले आहेत. या जोन्ही जागा सध्या भाजपच्या ताब्यात असल्यामुळे निकालाची उत्सुकता आहे, असं वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिलं आहे.
दरम्यान, मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याने काही ठिकाणी बुधवारी फेरमतदान घेण्यात आलं होतं. पालघर तसंच भंडारा-गोंदिया मतदारसंघात जवळपास 25 टक्के EVM आणि VVPAT यंत्रामध्ये बिघाड झाल्याने शेकडो मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता.
उन्हामुळे आणि तापमानामुळे ही मतदानयंत्रं खराब होतात, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आलं होतं. पण त्यानंतर 24 तासांत, बिघाडाचं हे कारण सांगणारे गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले.
भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघरची जागा रिकामी झाली होती, तर भाजपला सोडचिठ्ठी देत नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या.
पालघर, भंडारा व्यतिरिक्त उत्तर प्रदेशच्या कैरानामध्ये महत्त्वाची लढत होत असून, देशभरातल्या इतर 10 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचाही निकाल आज लागणार आहे.
3. MPSC परीक्षेत जळगावचा रोहितकुमार राजपूत प्रथम
MPSC परीक्षेचा अंतिम निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. यात जळगावचा रोहितकुमार राजपूत प्रथम, तर मुलींमध्ये पुण्यातील रोहिणी नऱ्हे आणि राखीव गटातून सोलापूरचे अजयकुमार नष्टे प्रथम आले आहेत.

फोटो स्रोत, MANPREET ROMANA
लोकसत्ताच्या बातमीनुसार, उपजिल्हाधिकारी पदाच्या 14 जागांसह एकूण 377 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. पूर्वपरीक्षेमुळे 1 लाख 98 हजार 599 विद्यार्थी बसले होते. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे टप्पे पार करून 1 हजार 194 उमेदवार मुलाखतीस पात्र ठरले होते.
4. प्रो कबड्डी लीग : मोनू गोयत सर्वांत महागडा खेळाडू
प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामासाठी खेळाडूंची लिलाव सध्या सुरू आहे. लिलावाच्या पहिल्याच दिवशी भारती खेळाडूंनी कोटींच्या कोटी उड्डाणं केली आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
हिंदुस्तान च्या बातमीनुसार, पहिल्या दिवशी पटणा पायरेट्सचा माजी खेळाडू मोनू गोयतवर हरयाणा स्टिलर्सनं 1.51 कोटींची बोली लावली आहे. या बोलीसह मोनू प्रो-कबड्डीतला सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे.
मोनू पाठोपाठ राहुल चौधरी या दुसऱ्या क्रमाकांचा महागडा खेळाडू ठरला आहे. 1.29 कोटीच्या बोली तेलुगू टायटन्सनं राहुलवर लावली आहे.
यासोबतच नितीन तोमवर पुणेरी पलटनकडून 1.15 कोटींची बोली लागली आहे तर शशांक देवाडिगा 1.11 कोटीच्या बोलीवर उत्तर प्रदेश संघाकडून खेळणार आहे.
5. गोव्यातील बीचवर विनयभंग
गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातल्या नऊ जणांना कळंगुट पोलिसांनी दंगा माजवणं, विनयभंग तसंच दोन अल्पवयीन मुलांना मारहाण करणं, अशा विविध आरोपांखाली अटक केली आहे.
लोकमतने दिलेल्या बातमीनुसार, संबंधित प्रकरणातील तक्रारदार महिला बागा बीचवरच्या एका शॅकमध्ये बसली होती. या महिलेची दोन मुलं किनाऱ्यावर फिरत होती. त्याच वेळी तेथून जात असलेल्या 11 जणांच्या गटाने त्या मुलांचे मोबाईलवर फोटो काढण्यास सुरुवात केली.

आपल्या बहिणीचे फोटो काढत असल्याचे बघून त्या अल्पवयीन मुलीच्या भावाने त्यांना जाब विचारायला सुरुवात केली. त्यावेळी गटातल्या काही जणांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. घडलेल्या घटनेनंतर लागलीच मुलीच्या आईने कळंगुट पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली.
त्यानंतर पोलिसांनी आरोपांना शोधायला सुरुवात केली. गोव्यातून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि विविद कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)