सोशल : 'पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सदसद्विवेकबुद्धी लागते'

फोटो स्रोत, Getty Images
माझ्याविषयी असलेल्या द्वेषातूनच देशातील सारे विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, महाआघाडी वगैरे सगळं खोटं आहे. पंतप्रधानपद मिळविणं हा त्यांचा एकमेव मानस असून आता विरोधी नेत्यांमध्ये पंतप्रधानपदासाठी शर्यत सुरू झालीये, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वराज्य' नावाच्या ऑनलाइन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ही टीका केली आहे. तसंच आपण घराण्याची सत्ता राबवणारा नेता नसल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे.
गेल्या 4 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यांनी फक्त काही निवडक पत्रकारांना मुलाखती दिल्या आहेत.
याच मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर 'पंतप्रधानांनी निवडक पत्रकारांना मुलाखती देण्याऐवजी पत्रकार परिषद का घेत नाहीत?' असा प्रश्न आम्ही वाचकांसमोर उपस्थित केला. त्यावर वाचकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
नयन साळवी लिहितात, "सतत फेकाफेकी आणि आपल्या पक्षाच्या सोईनुसार खोटं बोलणारी व्यक्ती अशा गोष्टीला सामोरं जाऊच शकत नाही."

फोटो स्रोत, Facebook
तर सीताराम फडके यांनी मात्र पंतप्रधानांची बाजू घेत आपलं मत मांडलं आहे. ते म्हणतात,"चुका दाखवणं सोपं आहे. विकल्या जाणाऱ्या पत्रकारांना उत्तर द्यायला पंतप्रधान बांधील नाहीत. जनतेला ते पसंत नसतील तर जनता त्यांना त्याचं उत्तर 2019ला देईल."

फोटो स्रोत, Facebook
"त्यांना (मोदींना) फक्त भाषणं देता येतात. भाषण काय देतोय याचंही त्यांना भान नसतं. पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सदसद्विवेकबुद्धी लागते, ती त्यांच्याकडे कमी असावी म्हणून ते पत्रकार परिषद घेत नसावेत", असं मत चेतक लोखंडे यांनी व्यक्त केलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
"तुम्ही म्हणता तशी एखादी पत्रकार परिषद मनमोहन सिंगांची आठवते का? लक्षात ठेवा ते भारताचे पंतप्रधान आहेत", अशी आठवण अभिमन्यू माने यांनी दिली आहे.
तर अभिमन्यू माने यांनी दिलेल्या प्रतिक्रियेला राजेंद्र गाडेकर यांनी उत्तर दिलं आहे. "मनमोहन सिंग घ्यायचे पत्रकार परिषद. परंतु नरेंद्र मोदी पत्रकारांना सामोरं जायला घाबरतात असाच निष्कर्ष निघतो. कारण जाहीर पत्रकार परिषद स्क्रिप्टेड नसते", असं त्यांनी मत व्यक्त केलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
संदीप जाधव यांनी देखील मोदींवर टीका केली आहे. ते म्हणतात, "खास चॅनेलला मुलाखात देताना प्रश्नसुद्धा मोदींचे असतात. फक्त विचारणारा माणूस चॅनेलचा असतो."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















