#5मोठ्याबातम्या : महात्मा गांधींचे खुनी आज सत्तेत आहेत - स्वरा भास्कर

स्वरा भास्कर

फोटो स्रोत, FACEBOOK/SWARA BHASKER

फोटो कॅप्शन, स्वरा भास्कर
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. महात्मा गांधींची हत्या करणारे आज सत्तेत आहेत - स्वरा भास्कर

महात्मा गांधी यांची हत्या करणारे आज सत्तेत बसले आहेत, असं विधान अभिनेत्री स्वरा भास्करने केलं आहे.

लोकसत्ताच्या बातमीनुसार दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बोलताना स्वरा म्हणाली, "महात्मा गांधींना ठार करण्यात आलं, तेव्हा अख्खा देश शोकसागरात बुडाला होता. तरीही काही लोक असे होते, ज्यांनी आनंद व्यक्त केला, उत्सव साजरा केला. तेच लोक आज सत्तेत आहेत. त्यांना आपण तुरुंगात टाकणार का? नाही ना. त्याचं उत्तर नाही असंच आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

"सद्यस्थितीत समाजात काहीही झालं की त्यांना तुरुंगात डांबा, असा माहोल आहे. असा रक्तपिपासू समाज होणं ही चांगली बाब नाही," असं स्वरा पुढे म्हणताना दिसते.

2. रंजन गोगोई होणार सरन्यायाधीश?

सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशपदासाठी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी केंद्र सरकारकडे केली आहे, अशी बातमी NDTVने दिली आहे.

3 ऑक्टोबरला गोगोई सरन्यायाधीश म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे, असं बातमीत म्हटलं आहे.

रंजन गोगोई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रंजन गोगोई

कायदा मंत्रालयानं देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना एक पत्र पाठवून नव्या सरन्यायाधीशांसाठी शिफारस करावी, अशी विनंती केली होती. या पदावर ज्येष्ठतेनुसार न्यायमूर्तींना संधी देण्याची परंपरा आहे. यात गोगोई यांचं नाव सर्वांत आघाडीवर असून त्यांच्याच नावाची सरन्यायाधीशांनी आपला उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली आहे, असं सूत्रांच्या हवाल्याने NDTVने या वृत्तात म्हटलं आहे.

3. रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

गुरुग्राममध्ये गृहसंकुल आणि व्यापारी संकुल उभारण्यासाठी जमीन खरेदीत अमनियमितता केल्याप्रकरणी हरियाणा सरकारनं काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

वाड्रा यांच्यासह हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा, स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी आणि DLF या कंपन्यांच्या संचालकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना रॉबर्ट वड्रा यांनी ANIला सांगितलं, "निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुख्य मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारनं हा जुना मुद्दा उकरून काढला आहे."

4. सहा राज्यांत डॉक्टर्सचं प्रमाण अधिक

दिल्ली, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब आणि गोवा या राज्यांत WHOने सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त डॉक्टर आहेत. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे. 1,000 लोकांमागे 1 डॉक्टर असायला हवा, असं प्रमाण WHOनं दिलं आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

या बातमीनुसार तामिळनाडू राज्यात 253 लोकांमागे एक डॉक्टर आहे, त्याखालोखाल दिल्ली, कर्नाटक, केरळ, गोवा आणि पंजाब या राज्यांचा क्रमांक लागतो.

महाराष्ट्राचा पहिल्या 5 राज्यांमध्ये समावेश नाही.

झारखंडमध्ये सर्वांत वाईट स्थिती असून या राज्यात 8180 लोकांमागे 1 डॉक्टर आहे.

5. यंदा 5.42 कोटींचे IT returns जमा

2018-19 या आर्थिक वर्षीसाठी 5.42 कोटींच्या आयकर भरणांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हा आकडा 3.17 कोटी होता, म्हणजे तुलनेने हे प्रमाण 71 टक्क्यांनी वाढलं आहे, असं आयकर विभागानं स्पष्ट केल्याचं टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या बातमीत म्हटलं आहे.

31 ऑगस्टपर्यंत IT रिटर्न्स फाईल करण्याची मुदत सरकारनं दिली होती. वेळेत रिटर्न्स न भरल्यास दंड ठोठावण्यात येईल, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आधीच वर्तवली जात होती.

यापैकी पगारदार वर्गातून 3.37 रिटर्न्स फाईल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी हा आकडा 2.19 कोटी होता.

"भारताची नागरिक आता कर भरण्याप्रति जागरूक होत आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमाने हा बदल शक्य झाला आहे," असं आयकर विभागाने म्हटल्याचं या बातमीत आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)