सोशल : मोदींकडून रिटर्न गिफ्टमध्ये हवे '15 लाख, नोकऱ्या, रोजगार, स्वस्त पेट्रोल...'

फोटो स्रोत, AFP
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे मोठे गिफ्ट आहेत, त्यामुळे आम्हाला दुसरं गिफ्ट नको अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणाऱ्या तर मोदी यांनी पंतप्रधान पदाची खुर्ची रिकामी करावी, अशा टीका करणाऱ्या प्रतिक्रिया आजच्या होऊ द्या चर्चा या सदरात आल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बीबीसी मराठीने वाचकांना प्रश्न विचारला होता की 'जर तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर त्याच्या बदल्यात रिटर्न गिफ्ट काय मागाल?'
आजच्या चर्चेत वाचकांनी मोठा प्रतिसाद दिला.
तर गिरीश फोंडे म्हणतात, तुम्ही जनतेच्या मुखावरचे हस्य हिरावले आहे. कृपया ते परत द्यावे. जर तुम्ही थकला असाल तर प्रधानसेवकाची खुर्ची इतर पक्षांना द्यावी. फोंडे यांनी नेपाळ आणि पाकिस्तानही हॅपिनेस इंडेक्समध्ये भारताच्या पुढे आहेत, असं ते म्हणतात.

फोटो स्रोत, facebook
राहुल माळी म्हणतात, आम्हाला गिफ्ट मागण्याची गरज नाही. आमचे पंतप्रधानच आमचे मोठे गिफ्ट आहेत आणि ते उत्तमरीत्या काम करत आहेत.

फोटो स्रोत, facebook
प्रशांत कांबळे यांनी कमीत कमी कर, परवडणाऱ्या दरात पेट्रोल, रोजगार आणि महिलांना, अल्पसंख्याक संरक्षण मिळावं अशी प्रतिक्रिया दिली आहे. देशात चांगली कायदा व्यवस्था व्हावी असंही ते म्हणाले आहेत.

फोटो स्रोत, facebook
तर कुणाल रुद्रके यांनी जनतेला भावनिक आवाहनं करणं बंद करावीत आणि धार्मिक सलोखा राहिलं हे पाहावं अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, कोणालाही पक्षात घेऊन पवित्र करणं बंद करावं आणि आयटी सेलच्या कर्मचाऱ्यांना ट्रोलिंग बंद करायला लावावे शिवाय उक्ती आणि कृतीमद्ये अंतर ठेऊ नका.

फोटो स्रोत, facebook
तर मुकुंद बडे यांनी देशाला मोदींसारख्या प्रशासकाची गरज आहे आणि त्यांनी अजून कठोर व्हावं, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मांजराच्या गळ्यात घंटा बांधणारा वाईट होतो, असंही ते म्हणतात.

फोटो स्रोत, facebook
एस. पी. यांनी फिरकी घेत फक्त 15 लाख द्यावेत असं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















