#5मोठ्याबातम्या : पुण्यात 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू

महिला अत्याचार
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. पुण्यात 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू

पुण्याच्या हिंजवडी परिसरात 12 वर्षांच्या दोन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. यातील एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

पीडित मुलीच्या आईनं हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी गणेश निकमला अटक केली आहे. तसंच त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतलं आहे.

"12 वर्षं वयाच्या दोन मुली रविवारी दुपारी एका मंदिरात दर्शनाला गेल्या होत्या. मंदिराजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी गणेश आणि त्याचा मित्र उभा होता. या दोघांनी या दोन अल्पवयीन मुलींना चॉकलेटचं आमिष दाखवून मंदिरामागील झुडुपात नेले. यातील एका मुलीवर दोघांनी आळीपाळीनं लैंगिक अत्याचार केले.

त्यानंतर दुसऱ्या मुलीवर एकाने बलात्कार केला. यानंतर या दोन्ही मुलींना धमकावण्यात आलं. या प्रकाराबाबत कोणाला सांगायचे नाही, सांगितलं तर बघ, अशी धमकी दिली गेली. यामुळे पीडित मुली अत्याचार होऊनही शांत होत्या.

दरम्यान, बुधवारी यातल्या एका पीडित मुलीची प्रकृती बिघडल्यानं तिला पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दुसऱ्या मुलीलादेखील त्रास होऊ लागल्यानं तिलाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा तिनं दोघींबाबत घडलेला प्रकार आईला सांगितला," अशी माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली आहे.

2. तिहेरी तलाकविरोधी विधेयकावर अध्यादेश जारी

केंद्र सरकारनं तिहेरी तलाकविरोधी विधेयकाच्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

तिहेरी तलाक

फोटो स्रोत, Getty Images

हा अध्यादेश 6 महिन्यांपर्यंत लागू असेल. या कालावधीत सरकारला संसदेत विधेयक मंजूर करावं लागेल. यासाठी सरकारला संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक मंजूर करावं लागेल.

तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर ते राज्यसभेत फेटाळण्यात आलं होतं. विधेयकात काही सुधारणा करण्याची मागणी काँग्रेसनं राज्यसभेत केली होती तर केंद्र सरकारच्या या निर्णयावर 'हा महिलांचा विजय' असल्याची प्रतिक्रिया शिया वक्फ बोर्डाचे प्रमुख वसीम रिजवी यांनी दिली होती.

3. मोदी-शहा संघाच्या वर्गाबाहेरचे विद्यार्थी - राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह संघाच्या वर्गाबाहेरचे विद्यार्थी आहेत, असा टोला राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून लगावला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 3 दिवसीय व्याख्यानमाला कार्यक्रम 'भविष्यातील भारत'च्या निमित्तानं राज ठाकरे यांनी ही टीका केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

अमित शहा-नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Reuters

या कार्टूनमध्ये सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकाला सांगत आहेत की, "आरएसएस ही एक लोकशाहीप्रधान संघटना आहे. संघात कोणा एकाची मनमानी चालत नाही. संघ विचारांवर अंकुश ठेवत नाही. संघात विविध स्तरांवर विचारांचे आदानप्रदान, चर्चा केली जाते."

याला उत्तर म्हणून स्वयंसेवकाच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी म्हटलंय की, "मोहनजी अगदी बरोबर सांगत आहात. आपण म्हणताय तेच आजपर्यंत आम्हाला 'शिकवलं' गेलं. मग या दोघांना नाही का ते 'शिकवलं' गेलं."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

दरम्यान राज ठाकरेंच्या व्यंगचित्रावर आक्षेपार्ह कमेंट केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

बदलापूरचा विवेक भागवत हा तरूण नेहमी विरोधात आणि अपशब्द वापरून कमेंट करत होता, असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. मारहाण करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांचा ठाणे मनसे जिल्हाध्यक्षकांकडून सत्कार करण्यात आला आहे.

4. राम मंदिरामुळे हिंदू-मुस्लीम शांतता वाढेल - मोहन भागवत

अयोध्येत राम मंदिर उभारल्यास हिंदू आणि मुस्लीम यांच्यातील मतभेद कमी होतील, असं मत आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलं आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

मोहन भागवत

फोटो स्रोत, RSS

"राम हा अनेकांसाठी देव आहे, काही लोक त्याला मर्यादा पुरुषोत्तम मानतात तर काहींसाठी तो इमाम-ए-हिंद आहे. जिथं रामाचा जन्म झाला आहे तिथं त्याचं मंदिर असावं,‌" अशी समाजामध्ये श्रद्धा आहे, असं भागवत म्हणाले आहेत.

"राम मंदिरामुळे हिंदू आणि मुस्लीम यांच्यातील मतभेद कमी होतील. मदिराचं काम शांततापूर्ण मार्गानं झालं तर मुस्लिमांकडे बोट दाखवणाऱ्यांना चपराक बसेल," असंही भागवत म्हणाले आहेत.

5. स्वच्छता कामगाराच्या अंत्यविधीसाठी कुटुंब हतबल

दिल्लीतल्या पश्चिम डबरी परिसरात अनिल नावाच्या (28) स्वच्छता कामगाराचा 20 फुट खोल गटारात पडून मृत्यू झाला. सकाळनं ही बातमी दिली आहे. अनिल यांच्या पश्चात पत्नी आणि 3 मुलं असं कुटुंब आहे.

त्यानंतर ट्वीटरवर शिव सन्नी या पत्रकारानं अनिल यांच्या शवाजवळ उभा असलेल्या त्यांच्या मुलाचा फोटो अपलोड केला आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

"अनिल यांचा मुलगा आपल्या वडिलांच्या पार्थिवावरील कापड बाजूला करून त्यांच्या चेहऱ्यावर आपले हात ठेवून रडत आहे," असं या फोटोत म्हटलं आहे. काही वेळातच हा फोटो सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि सेलेब्रिटींनी हा फोटो रीट्विट केला आहे.

मुंबई येथील केट्टो ही सामाजिक संस्था सोशल मीडियाद्वारे क्राउड फंडींग करते. अनिलच्या कुटुंबासाठी सध्या ही संस्था आर्थिक मदत जमा करत आहे. आतापर्यंत लोकांनी 50 लाख रुपये या कुटुंबासाठी केट्टोकडे जमा केले आहेत. घटना झाल्यानंतर पंधरा दिवसात निधी जमा करून ही संस्था या कुटुंबीयांना देणार आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)