अयोध्या : 29 ऑक्टोबरपासून सुरू होणार नियमित सुनावणी

न्यायदान

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

मशीद हा इस्लामचा अविभाज्य भाग नसल्याचा अलहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला आहे. 1994 साली देण्यात आलेला निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला आहे.

हा खटला पुढच्या मोठ्या खंडपीठाकडे सोपवला जाणार नाही असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे. तसंच 29 ऑक्टोबरपासून आयोध्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात नियमीत सुनावणी होणार आहे.

2010मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानं वादग्रस्त जमिनीच्या त्रिभाजनाचा निर्णय दिला होता. त्या निर्णयाविरोधातील याचिकांच्या सुनावणीत मशिदीचा मुद्दा आला.

एम. इस्माईल फारुकी विरूद्ध भारत सरकार या खटल्यात पाच सदस्यीय पीठानं मशीद इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानुसार, वादग्रस्त जमिनीचं सरकारला अधिग्रहण करता येईल, असं त्या खंडपीठानं तेव्हा स्पष्ट केलं होतं.

त्या निकालाचा विस्तारित पीठाकडून पुनर्विचार केला जावा, अशी मागणी अयोध्या मालमत्ता वादात पुढे आली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टाच्या त्रीसदस्यीय पीठानं सुनावणी घेतली. कोर्टानं सर्व बाजू ऐकल्यानंतर 20 जुलै रोजी निर्णय राखून ठेवला होता.

या निकालाचा परिणाम रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणावर होईल, असं मानलं जातं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)