ज्येष्ठ लेखिका कविता महाजन यांचे निधन

कविता महाजन

फोटो स्रोत, KavitaMahajan/Facebook

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

ज्येष्ठ लेखिका कविता महाजन यांच निधन झालं आहे. पुण्यातल्या चेलाराम हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या तीन दिवसांपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. त्यांना न्यूमोनिया झाला होता. गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असं चेलाराम रुग्णालयातल्या डॉक्टर वेदवती पुरंदरे यांनी बीबीसीला सांगितलं.

कविता महाजन काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये स्थायिक झाल्या होत्या.

कथा, कविता आणि कदंबरी अशा तिन्ही प्रकारात त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांची सर्वांत पहिली कदंबरी 'ब्र' ही चांगलीच गाजली. महिला सरपंच आणि त्यांच्या आयुष्यावर भाष्य करणारी ही कादंबरी होती.

दिशा महाजन

फोटो स्रोत, Disha Mahajan

तर त्यांची भिन्न ही कादंबरी एचआयव्ही आणि एड्सग्रस्तांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी होती. कुहूच्या माध्यमातून त्यांनी डिजिटल विश्वात एक वेगळा प्रयोग सादर केला.

इश्मत चुगताई यांच्या लघुकथांचा अनुवाद त्यांनी केला होता, ज्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळाला होता.

महिलांचे प्रश्न आणि त्याही पलिकडे जाऊन माणसांच्या आयुष्याचे प्रश्न त्यांनी कायम मांडले.

कविता महाजन यांची मुलगी दिशा महाजन यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे.

हे पाहिलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)