सोशल : 'काँग्रेसने 60 वर्षें गरीबी हटाओचं आश्वासन दिलं होतं हे लोक का विसरतात?'

फोटो स्रोत, Getty Images
2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रचार करताना आम्ही सत्तेत येऊ असे वाटले नव्हते. त्यावेळी काही जणांनी आश्वासने द्यायला सांगितली. आम्ही एवढी आश्वासने दिली की ती आता आठवतही नसल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत केला होता.
कलर्स मराठी वाहिनीवरील 'अस्सल पाहुणे, इरसाल नमुने' या कार्यक्रमात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली होती.
यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गडकरींवर टीका केली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
दरम्यान, नितीन गडकरी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राने चुकीची बातमी छापली असून यावरुन राहुल गांधींना लक्ष्य केलं.
नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी -
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
राहुल गांधींनी आधी मराठी शिकून घ्यावं, असा टोला लगावला आहे. राहुल गांधींना कधीपासून मराठी कळायला लागलं, असा खोचक सवालही त्यांनी विचारला.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर आलेल्या या निवडक संपादित प्रतिक्रिया.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
प्रकाश भावसार यांनी गडकरी यांचं अभिनंदन केलं आहे. "सत्य ऐकायला जरी कटू असलं तरी ते बोलायला धाडस लागतं. राजकीय मंडळी असे धाडस करत नाही, म्हणूनच गडकरीसाहेबांचे अभिनंदन," असं त्यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
तर अमोल सपकाळे म्हणतात, "भाजप खोटी आश्वासनं देऊन सत्तेत आले आहे, हे जनतेला कळून चूकलं होतं, आता तुम्ही स्वत: सत्य बोलल्यामुळे 2019ला जनता पुन्हा ही चूक करणार नाही, अशी आशा आहे."

फोटो स्रोत, Facebook
तर हा एक प्रकारचा धुर्तपणा असल्याचं म्हटलं आहे. खोटेपणा मान्य करून राजीनामा न देता सहानुभूती मिळवण्याचा हा गडकरींचा प्रयत्न असल्याचं संदीप पाटील यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
काँग्रेसने 60 वर्षे गरीबी हटाओचे आश्वासन दिले होते हे लोक का विसरतात? आश्वासनं देणे हा निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग आहे. त्यातलं सगळंच करणं शक्य होईलच असं नाही, असं मत राजेंद्र निऱ्हाळी यांनी व्यक्त केलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
दिनेश थिटे म्हणतात, "खरंतर आम्हाला हे प्रत्यक्षात दिसत होतं, फरक एवढाच झाला की तुम्ही तुमच्या तोंडाने कबुल केलंत, पुढच्या वेळी आम्ही सावध राहू."

फोटो स्रोत, Facebook
तर अमित तळेकर यांनी "याला सत्यवचन म्हणावं की निर्लज्जपणा," असा सवाल उपस्थित केला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)