सोशल : 'राम मंदिरात ना उद्धव ठाकरे ना मोहन भागवतांना रस आहे, दोघांनाही राजकारणात रस'

फोटो स्रोत, Getty Images
राम मंदिराचा विषय ऐरणीवर आलाय म्हणजे निवडणुका जवळ आल्यात वाटतं, असं मतदार आता म्हणू लागले आहेत.
गुरुवारी दसऱ्याच्या निमित्तानं मोहन भागवत यांनी राम मंदिरासाठी कायदा आणा, असं म्हटलं होतं. तर उद्धव ठाकरे यांनी मोदींना जमत नसेल तर शिवसेना राम मंदिर बांधेल असं म्हटलं होतं.
बीबीसी मराठीने 'होऊ द्या चर्चा'मध्ये उध्दव ठाकरे आणि मोहन भागवत यांच्यात राम मंदिर बांधण्यावरून सुरू असलेल्या चढाओढीविषयी वाचकांची मतं विचारली होती. यातील काही निवडक आणि संपादित मतं इथं देत आहोत.

शशिकांत सावंत विचारतात, "राम मंदिर बांधून कुणाचं भलं होणार आहे? नोकरीचा, शेतकऱ्याचा, शिक्षणाचा का दवाखान्याचा प्रश्न सुटणार आहेत का?"

त्यांना राम मंदिरात रस नाही तर त्यांना राजकारणात रस असल्याचं वैशाली चौधरी म्हणतात.

रश्मी देसाई म्हणतात, "शिवसेनेची पोपट-पंछी. आताच बरं आठवलं. काम न करता नुसतं श्रेय घ्यायची धडपड. आतापर्यंत झोपले होते काय?"

यतीराज पाटील म्हणतात, "शेती सोडून आणि शेतकरी सोडून सगळे बाकीचे प्रश्न तुम्हालाच माहीत. आम्हाला काही घेणं देणं नाही. संघ आणि शिवसेना नेत्यांनी एक दिवस शेतीत राबून बघावं, नाही राममंदिर विसरलात तर या काळ्या आईची शपथ."

दया पवार प्रश्न करतात की, लोकसभेत आणि राज्यसभेत शिवसेनेचे संख्याबळ किती आहे? कोर्टात केस आहे, मग हे राम मंदिर कसे बांधणार?

दामोदर देशमुख यांच्यामते, "आम्ही हिंदू आहोत, अयोध्येत राम मंदिर व्हावे ही आमची अंतिम इच्छा आहे. कोणत्या गार्डच्या शिटी वाजवण्याने गाडी चालू झाली यात आम्हाला इंटरेस्ट नाही आणि कर्तव्यही नाही."

सिद्धार्थ नाईक म्हणतात, "सदर प्रश्न अजून न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे कोणी कितीही राम मंदिरासाठी आग्रह धरला तरीही न्यायालयाचा निकाल येईपर्यंत कृती करता येणे निव्वळ अशक्यच आहे."

प्रदीप शिंपी विचारतात, राम मंदिर बांधून जर रामराज्य येत असेल तर काय हरकत आहे? तर "शेतकऱ्यांमध्ये राम आणा" असं चंद्रकांत काळे म्हणतात.
सत्ता स्थापण्यासाठी थापा माराव्या लागतात असं भारत साळवे म्हणतात.
प्रदीप चौगले म्हणतात, "राम मंदिर झाले पाहिजे. राममंदिर आपली आस्था आहे. कोणीही बांधू या."
"दोघेही लोकांना फसवत आहेत. हे मताचं राजकारण आहे," असं तात्याराव गायकवाड म्हणतात.
आर संदिप पाटील यांच्यामते एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. तर आसावरी शास्त्री यांच्यासह अनेक वाचकांनी निवडणुका जवळ आल्यात त्यामुळे हे परत सुरू झाल्याचे म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















