फेकन्यूजमुळे मारल्या गेल्या राजस्थानातल्या शांतादेवी

व्हीडिओ कॅप्शन, फेकन्यूजमुळे राजस्थानातल्या शांतादेवी मारल्या गेल्या
Published

राजस्थानातल्या कालबेलिया वाडी समाजातल्या शांतादेवी यांची जमावानं हत्या केली. मुलांना पळवणाऱ्या टोळीतल्या महिला असा समज करून अहमदाबादमध्ये लोकांनी त्यांना मारलं. पण, भिक्षा मागून गुजराण करणं यावर या समाजाची उपजिविका चालते.

अहमदाबादमध्ये त्या त्याचसाठी गेल्या होत्या. मात्र, याचकाळात व्हॉट्सअपवर मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरत असल्याच्या फेक न्यूज व्हायरल झाल्या होत्या. याच फेकन्यूजच्या नादात गुजरातमध्ये शांतादेवींवर हल्ला झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)