#ThugsOfHindostan : 'आमिर खानने पायरट्स ऑफ द कॅरिबियनची 'परफेक्टली' वाट लावली आहे'

ठग्ज ऑफ हिंदूस्तान

फोटो स्रोत, Twitter

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

दिवाळीच्या मुहूर्तावर 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पहिला शो संपल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

या चित्रपटात आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांसारखी तगडी स्टारकास्ट, व्हीएफएक्स आणि 300 कोटींचं बजेट असलेला हा चित्रपट सपाटून आपटल्याचं दिसत आहे.

या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच आमिर आणि अमिताभ बच्चन एकत्र आले. अर्थातच जेव्हा बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आणि बॉलिवूडचा महानायक एकत्र येतात, तेव्हा प्रेक्षकांना चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा असतात. यावेळी मात्र प्रेक्षकांची घोर निराशा झाल्याचं चित्र आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक आणि समीक्षक तरण आदर्श यांनी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ला अवघे दोन स्टार दिले आहेत.

'प्रत्येक चकाकणारी गोष्ट सोनं नसते,'अशा शब्दांत त्यांनी चित्रपटाचं वर्णन केलं आहे. कथानक आणि दिग्दर्शन या बाबतीत हा चित्रपट पूर्णपणे फसल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

हसन ऑरिडरू म्हणतात, जर धूम -3 सर्वाधिक कमवलेला चित्रपट ठरू शकतो, तर 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ने 300 कोटींचा टप्पा ओलांडला म्हणून आश्चर्य वाटून घेऊ नका.

प्रतिक्रिया

फोटो स्रोत, Twitter

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

रोहित करेकर यांनी, हृतिक रोशननं हा चित्रपट न करून स्वत:चं करिअर वाचवल्याबद्दल त्याचं अभिनंदन केलं आहे.

प्रतिक्रिया

फोटो स्रोत, Twitter

तर जशन रंधवा यांनी आपल्या प्रतिक्रियेत, जेव्हडी मेहनत ते जहाज बनवण्यासाठी घेतली, तेव्हडी मेहनत दर चित्रपटाच्या स्टोरीवर घेतली असती तर बरं झालं असतं असं म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

आमिर खान बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आहे यात काहीच शंका नाही, कारण त्यानं परफेक्टली पायरट्स ऑफ द कॅरिबियनची वाट लावली आहे, असं डॉ. गिल या ट्विटर अकाउंटवरून लिहिण्यात आलं आहे.

प्रतिक्रिया

फोटो स्रोत, Twitter

दरम्यान, आमीर खानने काल रात्री फेसबुकवर एक भला मोठा मेसेज शेअर केला आहे. ज्यात त्यांनं, आम्ही खूप प्रेमाने आणि मेहनतीने हा चित्रपट बनवला आहे. प्रेक्षकांना देखील हा चित्रपट आवडेल अशी आशा व्यक्त केली आहे.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

तसंच, या चित्रपटाचा संपूर्ण प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. तुम्ही सगळ्यांनीच अतिशय चांगलं काम केलं आहे आणि म्हणूनच या चित्रपटचा एक भाग बनता आलं याचा मला आनंद आहे, असं त्यानं म्हटलं आहे.

सोशल मीडियावर या सिनेमाबाबत नकारात्मक प्रतिक्रिया दिसून येत आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)