विजयाचं श्रेय हे संघाच्या कर्णाधाराला मिळणं ही दुर्देवी बाब - गौतम गंभीर

फोटो स्रोत, Getty Images
भारतात क्रिकेटमध्ये संघाच्या विजयाचं श्रेय हे केवळ कर्णधाराला मिळतं ही दुर्दैवी बाब आहे अशी खंत भारताचा स्टार क्रिकेटपटू गौतम गंभीर यानं बीबीसीला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्ती केली. यश हे एका व्यक्तीचं नसून ती सांघिक जबाबदारी आहे. मात्र सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोणी, विरोट कोहली यांच्या कर्णधारपदाच्या काळात विजयाचं श्रेय हे त्यांनाच मिळाल्याची भावना गंभीरनं व्यक्त केली.
2011च्या वर्ल्ड कप विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सलामीवीर गौतम गंभीरने निवृत्ती घेतली आहे. यानिमित्तानं बीबीसीच्या प्रतिनिधी सूर्यांशी पांडे यांनी गंभीरच्या दिल्लीतल्या घरी जाऊन त्याच्याशी संवाद साधला. यावेळी, अनेक प्रश्नांवर गंभीरनं दिलखुलासपणे उत्तरं दिली. तर, क्रिकेट विश्वातील घडामोडींबद्दल नाराजीही व्यक्त केली.
श्रीलंकेचा सुप्रसिद्ध बॉलर मुथय्या मुरलीधरनसमोर आपला टिकाव लागत नसल्याचं त्यानं प्रांजळपणे कबूल केलं. तर क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करूनही लष्करात निवड न झाल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली.
गौतम गंभीरची मुलाखत खाली दिलेल्या बीबीसी विश्व बुलेटीनच्या युट्यूब लिंकमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तसंच, त्याची पूर्ण मुलाखत बीबीसी न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलवरही पाहायला मिळेल.
बीबीसी विश्व बुलेटीन पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)















