चंद्रपुरात बिबट्याचे हल्ले सुरूच, बौद्ध भिक्कूंनंतर आता महिला ठार

बौद्ध भिक्षु राहुल बोधी

फोटो स्रोत, Nitesh Raut

फोटो कॅप्शन, बौद्ध भिक्कू राहुल बोधी
    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोऱ्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन दिवसांपूर्वी बौद्ध भिक्कू राहुल बोधी यांचा मृत्यू झाला होता. तिथंच शुक्रवारी पुन्हा एका शेतकरी महिलेला बिबट्यानं ठार केलं आहे.

चंद्रपूर जिल्यातल्या वरोरा तालुक्यातील्या अर्जुनी गावालगतच्या शिवारात शुक्रवारी ही घटना घडली. निर्मला श्रीरामे (वय45) या शेतात काम करत असताना बीबट्यानं त्यांच्यावर हल्ला केला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या परिसरातली ही गेल्या पंधरा दिवसांतली चौथी घटना आहे.

याआधी सुद्धा घडली अशीच घटना

पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामदेगी परिसरात भन्ते राहुल बोधी विपश्यनेला बसले होते. त्यावेळीच बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. घटनेची माहिती मिळताच गावकाऱ्यानी घटनास्थळी धाव घेतली.

चंद्रपूर जिल्ह्यातल्या खडसंगी अंतर्गत येणारं 'रामदेगी' पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. बौद्ध भिक्षूंचं विपश्चनेच हे केंद्र असल्याने अनेक भन्ते याठिकाणी ध्यानसाधना करण्यासाठी येतात. घनदाट जंगलानं वेढलेला हा परिसर ताडोबा बफर झोन चिमूर मध्ये येतो.

11 तारखेच्या सकाळी राहुल बोधी रामदेगी परिसरात डोंगराळ भागात ध्यानस्त बसले होते. त्यावेळी त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात भन्ते राहुल बोधी ठार झाले. ताडोबा अंधारी व्यग्र प्रकल्पाच्या जवळच असणाऱ्या बफर झोन कंपार्टमेंट क्रमांक 60च्या हद्दीत हा हल्ला झालाय.

प्रत्यक्षदर्शी भन्ते धम्मपाल बोधी यांनी हा थरार डोळ्यांनी पाहिला. ते सांगतात "भन्ते राहुल बोधी विपश्यनेसाठी बसले होते. सकाळी 10.30च्या सुमारास आम्ही त्यांना भोजन देण्यासाठी गेलो. घटनास्थळी पोहोचलो तेव्हा बिबट्या भन्तेजींना खात होता. मी आरडाओरड केला. आणि आमच्या इतर भन्तेना घेऊन घटनास्थळी पोहोचलो. तेव्हा बिबट्या पसार झाला."

भिक्षु धम्मपाल यांच्यामते 9 वाजताच्या दरम्यान बिबट्याने भन्ते राहुल त्यांच्यावर हल्ला केला असावा. परंतु या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची सूचना त्यांना आधीच देण्यात आली होती.

जेरबंद करण्याची तयारी

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी ट्रॅप कॅमेरे आणि दोन पिंजरे लावण्यात आले आहे. सोबत STPF चे 9 कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आल्याची माहिती स्थानिक वनअधिकारी जी. पी. नरवणे यांनी दिली आहे.

नरवणे म्हणाले "बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्याची तयार सुरू झालीय. त्यासाठी तज्ज्ञ कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. परंतु नागरिकांनी जंगल परिसरात जाऊ आणि योग्य ती खबरदारी घ्यावी."

घटनास्थळ

फोटो स्रोत, Nitesh Raut

फोटो कॅप्शन, घटनास्थळ

भन्ते राहुल यांच्यावर हल्ला होण्याच्या आदल्या दिवशीच अर्जुन तिसरे नावाचा व्यतीवर हल्ला झाला होता.

तर सोमवारी अर्जुनीजवळील शेतात देवराव जीवतोडे (६५) हे रात्री जागलीसाठी शेतात गेले होते. सकाळी मचाणवरून खाली उतरतच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

यापूवी अर्जुनी गावातील्या राहिवाशी तुळसाबाई किसन केदार (६२) यांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)