भारताच्या 'या' युद्धनौकेमुळे भरणार अमेरिका, चीनला धडकी

फोटो स्रोत, Indian Navy
गेली दहा वर्षं भारताच्या पहिल्या पूर्णतः स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेचं बांधकाम सुरू आहे. गेल्या 10 वर्षांत अनेक कारणांमुळे या युद्धनौकेच्या बांधकामात उशीर होत गेला. पण आता तिच्यावर शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे. काही दिवसांतच 'विक्रांत'च्या समुद्रात चाचण्या सुरू होतील.
हिंदी महासागर हा जगातला तिसरा मोठा महासागर असून भारत, चीन आणि अमेरिका या महासागरात आपल्या नौदलाच्या मदतीने वर्चस्व गाजवू पाहत आहेत. यासाठी साहजिकच विमानवाहू युद्धनौकेची आवश्यकता आहे. भारतीय नौदलात सध्या INS विक्रमादित्य ही एकमेव विमानवाहू युद्धनौका कार्यरत आहे.
त्यामुळेच भारतानं कोचीन इथे स्वदेशी बनावटीची विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका बांधायला सुरुवात केली आहे. साडेसदोतीस हजार टन वजनाची ही युद्धनौका संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आली आहे. या युद्धनौकेची नेमकी खासियत काय आहे? याची सविस्तर माहिती बीबीसीचे प्रतिनिधी जुगल पुरोहीत यांनी या युद्धनौकेवर प्रवेश मिळवून जाणून घेतली.
युद्धनौकेबद्दलचा सविस्तर रिपोर्ट तुम्हाला खाली दिलेल्या बीबीसी विश्वच्या बुलेटीनमध्ये पाहता येईल.
हे बीबीसी विश्व बुलेटीन तुम्ही सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता मोबाईलवर जिओ टीव्ही अॅपवर पाहू शकता.
बीबीसी विश्व बुलेटीन पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)















