नरेंद्र मोदी, कलाकारांच्या भेटीत राम मंदिरावर चर्चा झाली?

काही लोक या फोटोला 'सेल्फी ऑफ 2019' म्हणत आहेत.

फोटो स्रोत, HYPE PR

फोटो कॅप्शन, काही लोक या फोटोला 'सेल्फी ऑफ 2019' म्हणत आहेत.
    • Author, फॅक्ट चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बॉलीवूडमधल्या काही निवडक कलाकारांसोबत गुरुवारी बैठक घेतली. यानंतर नरेंद्र मोदी आणि या कलाकारांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलीवूडच्या कलाकारांनी पंतप्रधान मोदींकडे अयोध्येत राम मंदिर बांधण्याची मागणी केली, असा संदेशही या फोटोसह शेअर केला जात आहे. पण खरोखर अशी काही चर्चा हा भेटीत झाली होती का?

बीबीसीने या संदेशाची खतरजमा केली असता, यातील सत्य पुढं आलं.

या भेटीचे फोटो सिनेक्षेत्रातील लोकांव्यतिरिक्त पंतप्रधान मोदींनी या फोटोला इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलं आहे. या फोटोला 22 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.

पण सोशल मीडियावर या फोटोची नकली कॉपीसुद्धा शेअर केली जात आहे. ज्यात काही कलाकारांच्या कपाळावर 'जय श्री राम' लिहिलेलं दिसून येतं.

काही लोकांनी ट्वीटर आणि फेसबुकवर या कलाकारांमध्ये एकही खान नावाचा अभिनेता समाविष्ट नसल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. काही लोकांनी हे पण लिहिलंय की, राम मंदिरावरील चर्चेसाठी पंतप्रधान कार्यालयाकडून फक्त हिंदू कलाकारांना बोलावण्यात आलं होतं.

या दाव्यांत किती तथ्य आहे? बैठकीत कोण सामील होतं? आणि ही बैठक कुणी आयोजित केली होती? हे जाणून घेण्यासाठी आम्ही या बैठकीला उपस्थित असलेल्या काही कलाकारांसोबत संवाद साधायचा प्रयत्न केला.

बैठकीचं कारण

चित्रपट निर्माता करण जोहर यांच्या टीमनं बीबीसीला या बैठकीबाबत सविस्तर सांगितलं.

"भारतीय संस्कृती आणि समाजावर चित्रपटांचा काय प्रभाव पडतो, यावर चर्चा करण्यासाठी ही विशेष भेट होती. करमणुकीच्या माध्यमातून देशात कसा बदल घडवून आणता येऊ शकतो, यावर मोदींनी या बैठकीत चर्चा केली."

पंतप्रधान मोदी आणि कलाकार

फोटो स्रोत, HYPEPR

बैठकीत चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनी मोदींबरोबर जीएसटीवरही चर्चा केली. तसंच काही नवीन कल्पना मांडण्यात आल्या, ज्यावर सिनेक्षेत्र भविष्यात काम करेल.

चित्रपट निर्माती एकता कपूर, अभिनेता राजकुमार राव, आयुष्यान खुराना आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या मते, ही बैठक चांगली झाली. तसंच नवीन कलाकारांबद्दलची पंतप्रधान नरेंद्र मोदींची वागणूकही आवडली.

पण या बैठकीत राम मंदिरावर चर्चा करण्यात आली किंवा राजकीय चर्चा करण्यात आली, या बाबीला करण जोहरच्या टीमनं स्पष्ट शब्दांत नकार दिला.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

बॉलीवूडमधील कलाकारांचं हे प्रतिनिधी मंडळ गुरुवारी सकाळी एका विशेष विमानानं दिल्लीला पोहोचलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

बैठकीचे अयोजक

चित्रपट निर्माता महावीर जैन आणि मौलिक भगत या बैठकीचे आयोजन केलं होतं. करण जोहर यांच्या मदतीनं या सर्व कलाकारांना बैठकीसाठी बोलावलं, असं सांगण्यात आलं.

महावीर जैन आणि मौलिक भगत दोघे कलाकारांच्या मोदींसोबत झालेल्या गेल्या 2 बैठकांवेळी उपस्थित होते.

भारतीय कलाकार आणि मोदी

फोटो स्रोत, SPICE PR

माध्यमांमधील रिपोर्टनुसार, मौलिक भगत गुजरातमधल्या अहमदाबाद शहरातील एका सॉफ्टवेअर आणि मीडिया फर्मचे मालक आहेत. त्यांना नरेंद्र मोदींच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक मानलं जातं.

मौलिक भगत यांच्या मते, ते गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांच्या राजकीय घडामोडींचे ऑनलाईन आणि सोशल मीडिया संयोजक राहिले आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)