शबरीमलावर मोदी बोलले : 'डावे भारताच्या अध्यात्माचा सन्मान करत नाहीत'

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. शबरीमलाप्रकरणी केरळ सरकारची वागणूक लाजिरवाणी - नरेंद्र मोदी

"केरळ सरकारकडून आम्ही अशा प्रकारे द्वेषाच्या व्यवहाराची अपेक्षा केली नव्हती. इथे केरळ सरकारचा व्यवहार हा इतिहासात कोणत्याही सरकारकडून किंवा पक्षाकडून देण्यात आलेल्या सर्वांत लाजिरवाण्या वागणुकींपैकी एक आहे," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळ सरकारवर टीका केली आहे. शबरीमला आणि तीन तलाकच्या मुद्द्यावरुन डावे आणि काँग्रेस सरकारवर त्यांनी निशाणा साधला आहे, अशी बातमी लोकसत्तानं दिली आहे.

मोदी म्हणाले, "आम्हाला माहिती आहे की कम्युनिस्ट लोक भारताचा इतिहास, संस्कृती आणि अध्यात्माचा सन्मान करीत नाहीत. मात्र, कोणीही त्यांच्याकडून अशा प्रकारे द्वेषपूर्ण वागणुकीची अपेक्षा केली नव्हती."

काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले, "काँग्रेस शबरीमला प्रकरणावरून संसदेत वेगळी आणि पतनमथिट्टात वेगळी भूमिका घेतं."

"काँग्रेस आणि डावे दोघेही लैंगिक समानता आणि सामाजिक न्यायावरुन मोठ-मोठे दावे करतात. या प्रकरणी मात्र त्यांचं वागण अगदी वेगळं आहे. NDA सरकार तिहेरी तलाक संपवण्यासाठी काम करत आहे. मात्र, डावे आणि काँग्रेस याला विरोध करत आहेत," असंही मोदींनी म्हटलं आहे.

2. डेली सोपमधील अभिनेत्रीला मंत्रीपद दिलं - शत्रुघ्न सिन्हा

"गेल्या लोकसभा निवडणुकीत देशातून मतांच्या सर्वाधिक टक्केवारीसह मी निवडून आलो होतो. मात्र सरकारनं टेलिव्हिजनवर काम केलेल्या अभिनेत्रीला मंत्री केलं. मी काय वाईट होतो?" असा सवाल भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी उपस्थित केला. ZEE24 तासनं ही बातमी दिली आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

शत्रुघ्न सिन्हा

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, शत्रुघ्न सिन्हा

"मी अजूनही मनानं भाजपशी जोडलेलो आहे. पक्षातून काढून टाकण्यात आले तर मला त्याची फिकीर नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत मी देशभरातून सर्वाधिक मतांच्या टक्केवारीसह निवडून आलो होतो. तरीही सरकारने मला मंत्रीपद दिले नाही. याउलट टेलिव्हिजनवरील एका अभिनेत्रीला थेट मनुष्यबळ विकास खाते दिलं."

"सरकारनं मला मंत्रिपद दिले असते तरी फरक पडला नसता. कारण हल्ली मंत्र्यांची स्वतंत्र अशी ओळख राहिलेली नाही," असंही त्यांनी म्हटलं आहे.

3. आर्थिक दुर्बलांचे 10 टक्के आरक्षण याच शैक्षणिक वर्षापासून

आर्थिक दुर्बलांसाठीचे १० टक्के आरक्षण याच शैक्षणिक वर्षापासून देशभरात लागू होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. NDTV इंडियानं ही बातमी दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"देशभरातील 40 हजार कॉलेज आणि 900 विद्यापीठांमध्ये हे 10 टक्के आरक्षण याच शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. यामुळे सद्यस्थितीला आरक्षणाला धक्का लागणार नाही. हे 10 टक्के आरक्षण अतिरिक्त असेल," असं जावडेकर यांनी म्हटलं आहे.

4. शाळांमधील मुलींची शौचालयं बंद - असर

अनेक शाळांमध्ये मुलींची शौचालय असूनही ते बंद ठेवण्यात येत असल्याचं 'असर'च्या अहवालातून समोर आलं आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा "महाराष्ट्र असर-2018' अहवालाचे प्रकाशन मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झालं.

विनोद तावडे, असरचा अहवाल

फोटो स्रोत, Vinod Tawde/Twitter

शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालये आहेत, मात्र ती बंदच असल्याचे 14.6 टक्के मुलींनी सांगितले. अनेक ठिकाणी तर शौचालय वापरण्यासाठी योग्य नसल्याचे 14.9 टक्के मुलींनी सांगितले. 6.6 टक्के शाळांमध्ये मुलींसाठी शौचालय नसल्याचेही अहवालात म्हटले आहे.

शाळांमध्ये पिण्याचे पाणी नसल्याचे 13.4 टक्के मुलांनी सांगितले. वीजपुरवठा सुरू केलेल्या शाळांची संख्या 78.9 टक्के आहे. तसेच 35.4 टक्के मुलांनी शाळेत संगणक नसल्याचं सांगितलं.

सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 33 ग्रामीण जिल्ह्यात 990 गावातील 19,765 घरांमध्ये करण्यात आलं. महाराष्ट्रात 14 सामाजिक संस्था, 21 विद्यापीठं आणि महाविद्यालयांच्या मार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले.

5. ब्राह्मण समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन

मराठा आणि धनगर समाजानंतर आता ब्राह्मण समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहे, हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली.

समस्त ब्राह्मण समाजानं येत्या 22 जानेवारीला मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन काढायचं ठरवलं आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

"ब्राह्मण समाजाला स्वतंत्र आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे आझाद मैदानात आम्ही शांततेच्या मार्गानं आंदोलन करणार आहोत," असं समस्त ब्राह्मण समाजाचे निमंत्रक विश्वजीत देशपांडे यांनी पत्रकात म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)