नरेंद्र मोदींना फिलिप कोटलर पुरस्कार देण्यामागचं गौडबंगाल

फोटो स्रोत, PIB
- Author, टीम बीबीसी हिंदी
- Role, नवी दिल्ली
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
देशाची निस्वार्थ सेवा तसंच आर्थिक आणि सामाजिक स्तरावर देशाचा विकास केल्याबद्दल 'फिलिप कोटलर प्रेसिडेन्शियल अवार्ड' मिळाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी सोशल मीडियावर जाहीर केलं.
हा पुरस्कार पहिल्यांदाच देण्यात आला असून या पुरस्कारामागे जी भावना आहे ती लोक, लाभ आणि पृथ्वी यांच्याशी प्रेरित आहे, असं मोदींच्या वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे.
'फिलिप कोटलर अवार्ड वेबसाईट'च्या मते, मार्केटिंग, कम्युनिकेशन आणि बिझनेस मॅनेजमेंटच्या विश्वात छाप उमटवणाऱ्या व्यक्तीला सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
मोदींच्या ट्वीटर हँडलवर पुरस्काराचे फोटो आल्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं.
पण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी यावरून मोदींवर टीका केली आहे.

फोटो स्रोत, RAHUL GANDHI/TWITTER
त्यांनी ट्वीट करत म्हटलं, "पंतप्रधान मोदींना फिलिप कोटलर प्रेसिडेन्शियल पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचं अभिनंदन. हा इतका प्रसिद्ध पुरस्कार आहे की यासाठी ना कोणती निवड समिती आहे, ना हा पुरस्कार यापूर्वी कुणाला देण्यात आला आहे. या पुरस्कारामागे अलीगडमधील एक कंपनी आहे जिचं नाव कुणालाही माहिती नाही."
यानंतर काही वेळानं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांनी ट्वीट करून राहुल गांधींना उत्तर दिलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
त्यांनी म्हटलं, "ही टीका अशा व्यक्तीनं केली आहे, ज्यांच्या कुटुंबानं स्वत: भारतरत्न घेण्याचा प्रयत्न केला होता."
यानंतर हा पुरस्कार नेमका काय आहे आणि तो पहिल्यांदाच देण्यात आला आहे का, असे प्रश्न उपस्थित झाले.
फिलिप कोटलर कोण आहेत?
हा पुरस्कार प्राध्यापक फिलिप कोटलर यांच्या नावानं दिला जातो. ते अमेरिकेच्या जॉर्जियामधील केलॉग्स स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये गेल्या 50 वर्षांपासून मार्केटिंग हा विषय शिकवतात.
केलॉग्स युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटनुसार, कोटलर यांनी हार्वर्ड आणि शिकागो विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे आणि 1956मध्ये एमआयटीतून डॉक्टरेट मिळवली आहे.

फोटो स्रोत, PKOTLER.ORG/BIO/
87 वर्षांचे फिलिप कोटलर यांना आधुनिक मार्केटिंगचं जनक आणि मार्केटिंग गुरू म्हटलं जातं.
त्यांनी 'माय एडवेन्चर्स इन मार्केटिंग' हे आत्मकथनपर पुस्तक लिहिलं आहे. ज्यात मार्केटिंगच्या भविष्याविषयी सांगितलं आहे.
फिलिप कोटलर पुरस्कार काय?
कोटलर अवार्डच्या वेबसाईटनुसार, जी संस्था हा पुरस्कार देते तिचं नाव वर्ल्ड मार्केटिंग समिट ग्रूप आहे. कॅनडातील टोरंटोमधील ही एक स्वतंत्र संस्था आहे. फिलिप कोटलर यांनी 2010मध्ये या संस्थेची स्थापना केली होती.

फोटो स्रोत, PIB
आंतरराष्ट्रीय मार्केटिंग संघटनेनुसार, 6 डिसेंबर 2017ला पहिल्यांदा कोटलर पुरस्कार देण्यात आला होता. दक्षिण कोरियाच्या शिला हॉटेलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पण फिलिप कोटलर प्रेसिडेन्शियल अवार्ड पहिल्यांदाच देण्यात आला आहे. त्यासाठी मोदींना निवडण्यात आलं आहे.
मोदींना पुरस्कार का?
वर्ल्ड मार्केटिंग समिट ग्रूपकडून दरवर्षी जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये फिलिप कोटलर मार्केटिंग फोरमचं आयोजन करण्यात येतं. 14 डिसेंबर 2018ला भारतात फोरमचं आयोजन करण्यात आलं होतं.
यासाठी भारतात ससलेन्स रिसर्च इन्स्टिट्यूटसोबत सहकार्य करार करण्यात आला आहे. 6 डिसेंबर 2017ला ही कंपनी स्थापन करण्याती आली होती. याचा अर्थ या कंपनीला 1 वर्षं 4 महिने पूर्ण झाले आहेत.
भारतीय कंपन्यांविषयी माहिती ठेवणारी वेबसाईट जॉबानुसार, अलीगडच्या दोदपुरमधील ससलेन्स कंपनीची कानपूरमध्ये नोंदणी झालेली आहे.
कंपनीनं कोटलर इम्पॅक्टबरोबर करार केला आहे. त्याअंतर्गत कंपनी 3 वर्षं भारतात या फोरमचं आयोजन करणार आहे, असं कंपनीची वेबसाईट सांगते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
मोदींना हा पुरस्कार का देण्यात आलं, हे प्राध्यापक मार्क ओप्रेस्निक यांच्या ट्वीटवरून थोडसं स्पष्ट होतं. मार्क कोटलर इमॅक्ट कंपनीचे मुख्य रिसर्च ऑफिसर आहेत.
त्यांनी ट्वीट केलं आहे की, "येत्या काळात भारतात फोरमचं आयोजन होईल तेव्हा तुमच्या भेटीची इच्छा आहे."

फोटो स्रोत, Twitter
असं असलं तरी त्यांनी ज्या @WMC_India ट्वीटर हँडलला ट्वीटमध्ये टॅग केलं आहे त्यावर काहीच पोस्ट करण्यात आलेलं नाही. या हँडलचा एकच फॉलोअर आहे आणि हे हँडल 9 लोकांनी फॉलो करतं. ही सर्व माणसं मोठे भारतीय व्यावसायिक आहेत.
आम्ही ससलेन्स कंपनीची वेबसाईट पाहण्याचा प्रयत्न केला. पण ती उघडत नव्हती.

फोटो स्रोत, Suslence.com
आम्ही कंपनीचं अर्काइव्ह पेज पाहिलं आणि तिथल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कळालं ती संबंधित व्यक्ती तिथं काम करत नाही.
कंपनीचे संचालक डॉ. तौसीफ सिद्दीकी झिया याबद्दल अधिक माहिती देतील, असं आम्हाला सांगण्यात आलं.
डॉ. तौसीफ यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकला नाही. पण द वायरमधील बातमीनुसार, "तौसीफ यांच्या मते, हा पुरस्कार खूप गोपनीय असतो."

फोटो स्रोत, Wms18
शिवाय वर्ल्ड मार्केटिंग समिट 2018 इंडियाचं पेजही उघडत नाहीये.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















