ऋषभ पंतसोबतची ती मुलगी कोण आहे?

फोटो स्रोत, INSTAGRAM
भारतीय क्रिकेट संघातील चर्चेत असणाऱ्या युवा खेळाडूंमध्ये ऋषभ पंत याचंही नाव आहे. 21 वर्षाचा ऋषभ पंत जेवढा आक्रमकपणे आणि वेगळ्या पद्धतीनं मैदानात खेळतो तेवढाच बिंधास्तपणे तो मैदानाबाहेर दिसत आहे.
विकेटकिपर ऋषभ यानं ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी क्रिकेट सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतर सध्या त्याला विश्रांती दिलेली आहे.
ऋषभ संघाबाहेर असला तरी तो सध्या चर्चेत आहे. स्फोटक फलंदाजी करणाऱ्या ऋषभने त्याच्या इन्स्टाग्रामवर एका मुलीबरोबरचा फोटो शेअर केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 1
"मला फक्त तुला आनंदी ठेवायचं आहे कारण तूच माझ्या आनंदाचं कारण आहेस." असं त्याने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.
या पोस्टमधली ती मुलगी ऋषभची गर्लफ्रेंड असू शकते असा कयास लावला जात आहे.
ही मुलगी कोण आहे?
ऋषभ पंतसोबतच्या त्या मुलीचं नाव इशा नेगी आहे. इशानंही तोच फोटो तिच्या इन्साग्रामवर शेअर केला आहे.
"माझा माणूस, माझा साथीदार, माझा बेस्ट फ्रेंड, माझ्या आयुष्याचं प्रेम," असं तिच्या पोस्टमध्ये इशानं लिहिलं आहे. त्यावरून या दोघाचं नातं स्पष्ट होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 2
इशाच्या फेसबुक अकाऊंटवरून मिळालेल्या माहितीनुसार ती देहरादूनची आहे. तिथल्याच जीसस अँड मेरी काँन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेली आहे. सध्या ती नोएडा येथील AMITY विद्यापीठातून इंग्रजी साहित्याचं शिक्षण घेत आहे.
ऑस्ट्रेलियादौऱ्यादरम्यान ऋषभ चर्चेत आला
ऋषभ पंत ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत चर्चेत आला. विकेट किपिंग व्यतिरिक्त ऋषभने फलंदाजीही चांगल्या प्रकारे केली.
सिडनीत झालेल्या टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने 159 धावांची भागीदारी केली. त्या कसोटी सामन्या चेतेश्वर पुजारानंतर ऋषभने सर्वात धावा केल्या.
पहाडी कुटुंबात जन्मलेल्या पंतने रुरकी शहरात शिक्षण घेतले. क्रिकेटमध्ये करिअर करायचं ठरल्यानंतर तो दिल्लीला आला.

फोटो स्रोत, Getty Images
19 वर्षाखालील क्रिकेट सामन्यात चांगली कामगिरी केल्यावर दिल्लीच्या IPL संघात खेळण्याची संधी मिळाली. IPLच्या मार्गानेच ऋषभने भारतीय संघात जागा निर्माण केली.
त्याची आक्रमकता आणि विकेटकिपिंग बघून ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पाँटिंननं ऋषभची तुलना अॅडम गिलख्रिस्ट यांच्याशी केली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















