CBIच्या संचालकपदी ऋषी कुमार शुक्ल यांची नियुक्ती

फोटो स्रोत, MPPOLICE
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने शनिवारी IPS अधिकारी ऋषी कुमार शुक्ल यांची CBIचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
शुक्ल CBIचे कार्यकारी संचालक नागेश्वर राव यांच्याकडून कार्यभार स्वीकारतील.
आलोक वर्मा यांच्या बरखास्तीनंतर राव या पदावर कार्यरत होते. सुप्रीम कोर्टाने CBI संचालकांच्या निवडित होत असलेल्या दिरंगाईबाबत असंतोष व्यक्त केला होता.

आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यातील वादामुळे CBI मध्ये वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती.
1983 च्या बॅचचे IPS अधिकारी असलेले ऋषी कुमार शुक्ला यांनी मध्यप्रदेशचे पोलीस महासंचालक म्हणूनही काम पाहिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्या समितीने ही निवड केली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)















