रॉबर्ट वाड्रांची ED कडून आज पुन्हा चौकशीची शक्यता : बीबीसी मराठी राऊंडअप

काँग्रेस, प्रियंका गांधी

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, रॉबर्ट वाड्रा
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

1. रॉबर्ट वाड्रा ED समोर हजर

मनी लाँड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची आज सुद्धा सक्तवसुली संचालनालयासमोर अर्थात ED समोर चौकशी होण्याची शक्यता आहे. बुधवारी ते स्वतः चौकशीसाठी हजर झाले होते. यावेळी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सरचिटणीस आणि त्यांच्या पत्नी प्रियंका गांधीही त्यांच्यासोबत होत्या. याबाबतचं सविस्तर वृत्त वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

2. मुंबई काँग्रेसमध्ये देवरांची निरुपम यांच्याविरोधात आघाडी

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपनं विजयासाठी आपली पूर्ण ताकद लावण्याची तयारी केली आहे. काँग्रेसनं प्रियंका गांधींना सक्रिय राजकारणात उतरवून षटकार मारल्याची चर्चा आहे. पण त्याचवेळी मुंबई काँग्रेसमध्ये सगळं आलबेल नसल्याचं चित्र आहे.

काँग्रेस, प्रियंका गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबई काँग्रेसमध्ये दुफळी

कारण माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी ट्वीट करून जाहीरपणे मुंबई काँग्रेसच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. तपशील इथे वाचा.

3. गंगेच्या स्वच्छतेवर भाजप नेते खोटं बोलत आहेत का?

दक्षिण भारतातील अनेक सोशल मीडिया ग्रुप्सवर अनेक छायाचित्रं शेअर केली जात आहेत. त्याबरोबर एक दावाही केला जात आहे की भाजपने गेल्या काही वर्षात गंगा स्वच्छतेचे अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.

गंगा

फोटो स्रोत, Social media

फोटो कॅप्शन, गंगा

काँग्रेसच्या काळात गंगा नदीची परिस्थिती अतिशय खराब होती. भाजपच्या काळात ती बरीच सुधारली आहे. काय आहे नेमकं तथ्य? वाचा इथे.

4. पोप फ्रान्सिस म्हणतात, कॅथलिक धार्मिक नेत्यांनी नन्सचं लैंगिक शोषण केलं

आखाती देशांच्या दौऱ्यावर असलेल्या पोप फ्रान्सिस यांनी धर्मगुरू नन्सचं लैंगिक शोषण करत असल्याची बाब मान्य केली आहे.

धर्म, ख्रिश्चन

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, पोप

पोप बेनडिक्ट यांना धर्मगुरू शोषण करत असलेल्या नन्सच्या धर्मसभेला बंद करावं लागलं होतं, हे सुद्धा पोप यांनी मान्य केलं आहे. याबाबत वाचा सविस्तर इथं वाचा.

5. ऑस्कर पुरस्कार सोहळा सूत्रसंचालकांविना

हलक्याफुलक्या विनोदी शैलीत केवळ चित्रपटच नाही तर सामाजिक, राजकीय विषयांवरही भाष्य करणारा सूत्रसंचालक हे ऑस्कर सोहळ्याचं वैशिष्ट्य.

पण यंदाचा ऑस्कर याला अपवाद असेल. यंदा ऑस्कर सोहळा हा सूत्रसंचालकांविनाच असेल. का झालं असं? हे वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)