संजय राऊत यांनी घेतली चंद्राबाबू नायडू यांची भेट- दबावतंत्र का पर्यायांची चाचपणी- बीबीसी मराठी राऊंडअप

शिवसेना, तेलुगू देसम, राजकारण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संजय राऊत यांनी चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली.
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

1. संजय राऊत यांनी घेतली चंद्राबाबू नायडू यांची भेट

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी दिल्लीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली. तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यात युतीवरून तणाव असताना राऊत यांनी दिलेल्या या भेटीला विशेष महत्त्व आहे. शिवसेनेचं हे दबावतंत्र आहे की पर्यायांची चाचपणी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वाचा सविस्तर.

2. गुलाबी टीशर्टवाली 'प्रियंका सेना' प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी उत्सुक...

प्रियंका गांधी, राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रियंका सेनेचे सदस्य

काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रियंका गांधी पहिल्यांदाच लखनौमध्ये गेल्या. राहुल गांधी यांच्यासह त्यांनी रोड शो मध्ये सहभाग नोंदवला. प्रियंका यांच्या स्वागतासाठी तसंच पुढील दौऱ्यासाठी गुलाबी टीशर्ट परिधान केलेले प्रियंका सेनेचे सदस्य तय्यार होते. परंतु या सेनेची स्वत: प्रियंका गांधी यांना कल्पना नव्हती. ही सेना नेमकं काय करते?

3. आम्हाला मूल नकोय कारण...

तुम्ही माझ्या परवानगीशिवाय मला जन्माला का घातलं, म्हणत मुंबईच्या रफाएल सॅम्युएल या 27 वर्षांच्या तरुणाने त्याच्याच आईवडिलांना कोर्टात खेचण्याची तयारी केली आहे. ज्या मानव जन्मविरोधी किंवा Anti-natalism तत्वज्ञानावर त्याचा हा निर्णय आधारित आहे. ठरवून मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेणारी जोडपी वाढत आहेत. त्यांची कारणंही ठोस आहेत. त्याच कारणांचा घेतलेला वेध. सविस्तर वाचा.

4. हंगेरीत अनोखी करावर सूट-चार मुलं जन्माला घाला आणि टॅक्स फ्री व्हा

चार किंवा त्यापेक्षा जास्त अपत्य असलेल्या महिलांना आयकरातून आजीवन सूट मिळेल असं हंगेरीच्या पंतप्रधानांनी जाहीर केलं. जास्तीत जास्त अपत्यांना जन्म द्यावा या उद्देशाने ही घोषणा करण्यात आली. युरोपियन देशांच्या तुलनेत हंगेरीत जन्मदराचं प्रमाण कमी आहे. हंगेरीची लोकसंख्या 32,000 कमी होते आहे. याच दिशेने उपाय म्हणून तरुण जोडप्यांना 36 हजार डॉलरचं व्याजमुक्त कर्ज दिलं जाणार आहे. तिसरं अपत्य झालं की ते कर्ज रद्द करण्यात येईल. काय आहे हंगेरीतली स्थिती-जाणून घ्या

5. ग्रॅमी पुरस्कारांवर महिलांचं वर्चस्व

जागतिक संगीत क्षेत्रातील मानाचा समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारांवर महिला कलाकारांनी मोहोर उमटवली.

ग्रॅमी पुरस्कार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लेडी गागा

लॉस अँजेलिसमध्ये झालेल्या सोहळ्यात लेडी गागा, चाइल्डिश गॅम्बिनो, ब्रँडी चार्ली यांनी पुरस्कारावर नाव कोरलं. पुरस्कार आणि मानकऱ्यांविषयी सविस्तर इथे वाचा.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)