CBI चे माजी हंगामी संचालक एम.नागेश्वर राव यांना कोर्टात एक दिवस बसून राहण्याची शिक्षा

नागेश्वर राव

फोटो स्रोत, PTI

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

CBI चे माजी हंगामी संचालक एम. नागेश्वर राव हे मुझफ्फरपूर दंगलीच्या प्रकरणात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर हजर झाले. महाधिवक्ता के.के. वेणुगोपाल एम.नागेश्वर राव आणि इतर अधिकाऱ्यांच्या वतीने कोर्टात हजर होते.

मुझफ्फरपूर येथील वसतीगृहात मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार मागच्या वर्षी उघडकीस आला होता. त्या प्रकरणी चौकशी अधिकारी अरुण कुमार शर्मा यांची बदली करू नये असे आदेश दिले असतानाही राव यांनी शर्मा यांची बदली केली होती. त्यावर कोर्टाने राव यांच्यावर ताशेरे ओढले होते.

त्यांनी काय घडामोडी झाल्या याची एक फाईल कोर्टासमोर सादर केली. तसंच माफीनामाही सादर केला.

महाधिवक्त्यांनी संयुक्त संचालक अरुण कुमार शर्मा यांच्या बदलीचा आदेश वाचला. त्यांनी पुढे असंही सांगितलं की शर्मा यांनी केंद्रीय सशस्त्र दलात बढतीवर पाठवण्यात आलं आहे. या सगळ्या प्रकरणात अनेक चुका होत्या असंही त्यांनी मान्य केलं. त्यांनी कोर्टाची बिनशर्त माफी मागितली. त्यांनी हे जाणूनबुजून केलं नाही असंही सांगितलं.

मग नागेश्वर राव यांनी कोर्टाचा अवमान केला असं मानायचं का असा प्रश्न विचारला. महाधिवक्त्यांनी सातत्याने कोर्टाची माफी मागितली आणि खंडपीठाला सांगितलं की हे सगळं जाणीवपूर्वक केलेलं नाही. न्यायालयात सादर होण्यासही आम्हाला उशीर झालेला नाही. नागेश्वर राव यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करू नये याबाबत ते न्यायालयाला विनंती करत होते.

सुप्रीम कोर्ट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुप्रीम कोर्ट

नागेश्वर राव यांची 32 वर्षांची कारकीर्द निष्कलंक आहे. त्यामुळे काही कारवाई झाली तर त्यांच्या कारकिर्दीला डाग लागेल राव यांनी कोर्टाची माफीही मागितली आहे. त्यामुळे त्यांच्यावर दया दाखवावी अशी विनंती केली.

त्यावर कोर्टाचा मान कोर्टाचा आदेश पाळून ठेवायचा असतो असं सरन्यायाधीशांनी सुनावलं आणि कोर्टाचं कामकाज संपेपर्यंत, कोर्टाच्या एका कोपऱ्यात जाऊन बसायचे आदेश दिले आणि एका आठवड्यात 1 लाखाचा दंड भरण्याचा आदेश दिला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)