Balakot: पाकिस्तानातल्या कारवाईसंबंधी या 5 महत्त्वाच्या बातम्या वाचा - बीबीसी राउंडअप

पाकिस्तान आणि भारताचा ध्वज

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

1. बालाकोटची संपूर्ण कारवाई 11 मुद्द्यांमध्ये

भारतीय वायुदलाने पाकिस्तानमधल्या बालाकोट इथे 26 फेब्रुवारीच्या पहाटे हवाई हल्ला केला. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा कँप आम्ही नष्ट केला, असं भारताचे परराष्ट्र सचिव वियज गोखले यांनी सांगितलं. या हल्ल्यात 'अनेक अतिरेकी मारले गेले', असंही ते म्हणाले.

हा हल्ला कसा झाला, नेमका कधी झाला, त्या कारवाईमध्ये पाकिस्तानचं नेमकं किती नुकसान झालं. जैश-ए-मोहम्मदचा तळ जो नेता चालवत होता तो कोण होता? पाकिस्तानसमोर कोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि आता पुढे काय होणार?

या प्रश्नांच्या उत्तरांसाठी ही बातमी वाचा.

2. बालाकोट प्रत्यक्षदर्शी: 'असं वाटलं की भूकंपच आला'

भारतीय वायुसेनेच्या लाढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे पाकिस्तानच्या बालाकोटमधल्या जैश-ए-मोहम्मदच्या एका तळाला लक्ष्य केलं. बालाकोट एक आझाद काश्मीर नावाच्या पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये येतं तर दुसरं आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे पाकिस्तानच्या हद्दीतील खायबर पख्तुनख्वा राज्यात येतं.

नेमकं मंगळवारी पहाटे काय घडलं ते, जिथे हल्ला झाला त्या खायबर पख्तुनख्वाच्या बालाकोट परिसरात राहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीला सांगितलं.

बीबीसी

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनानं केलाला हल्ला प्रचंड भीतीदायक होता, ज्यामुळे सगळ्यांचीच झोप उडाली.

बालाकोटच्या जाबा टॉपमध्ये राहणारे मोहम्मद आदिल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "हा हल्ला इतका भयंकर होता, की एका क्षणी असं वाटलं जणू भूकंपच आला आहे. या प्रत्यक्षदर्शींनी अजून काय पाहिलं हे जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा.

3. IAF: भारतीय वायुदलाच्या हल्ल्याच्या व्हायरल व्हीडिओचं सत्य - फॅक्ट चेक

सोशल मीडियावर व्हायरल झालेला आणि अनेक भारतीय न्यूज चॅनेल्सवर दाखवला जाणारा भारतीय वायुसेनेच्या एअर स्ट्राईकचा व्हीडिओ 26 फ्रेब्रुवारीच्या पहाटेचा नसून जुना आहे.

कारवाईचा व्हीडिओ

फोटो स्रोत, Sm viral video grab

मीडियामध्ये या एअर स्ट्राईकची बातमी आल्यानंतर #Surgicalstrike2, #IndianAirForce आणि #Balakot सारख्या हॅश टॅगसह हा व्हीडिओ ट्वीट केला जात आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या या व्हीडिओचं सत्य काय आहे हे जाणून घ्या.

4. जैशचं प्रशिक्षण केंद्र चालवणारा युसुफ अझर आहे तरी कोण?

युसुफ अझरविषयी माहिती सार्वजनिकपणे सहज उपलब्ध नाही. मात्र एका घटनेसंदर्भात युसुफ अझरविषयी स्पष्ट उल्लेख आहे.

कट्टरतावादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरचा युसुफ हा मेव्हणा. युसुफ अझर उर्फ उस्ताद घोरी हा पाकिस्तानमधल्या खैबर पख्तनुवा प्रांतातील बालाकोटमध्ये जैशचं सगळ्यांत मोठं प्रशिक्षण केंद्र चालवत होता.

युसूफ अझहर

फोटो स्रोत, AFP

डिसेंबर 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्स एअरबस IC-814 या काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं अपहरण करण्यात आलं. काठमांडूहून निघालेलं हे विमान भारतीय हवाई क्षेत्रात आल्यानंतर त्याचं अपहरण करण्यात आलं होतं.

अनेक ठिकाणी हे विमान नेण्यात आलं आणि शेवटी अफगाणिस्तानमधल्या कंदाहारमध्ये नेण्यात आलं. मौलाना युसुफ अझर हा विमान अपहरण करणाऱ्यांपैकी एक होता. युसूफ अझहरविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

5. IAF : पाकिस्तानी लष्कर म्हणतं प्रत्युत्तराची वेळ आणि जागा आम्ही ठरवू

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतानं केलेले दावे खोडून काढले आहेत.

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते

फोटो स्रोत, Getty Images

भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "आम्ही याचं प्रत्युत्तर देऊ, आमचं प्रत्युत्तर वेगळं असेल, त्याची वेळ आणि जागा आम्ही ठरवू. तुम्हाला काय करायचं होतं, ते तुम्ही केलं. आता आमची पाळी आहे."

"भारतानं जाणूनबुजून सामान्य लोकांवर हल्ला केला जेणेकरून त्यांना हा दहशतवाद्यांवर केलेला हल्ला आहे, असं दाखवता येईल आणि त्याचा निवडणुकीत फायदा घेता येईल," असंही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)