जम्मू बसस्टँडवर ग्रेनेड हल्ला, 2 ठार, 30 जखमी, एका संशयिताला अटक

जम्मू बस स्टँडवर झालेला ग्रेनेड स्फोट

फोटो स्रोत, AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, जम्मू बस स्टँडवर झालेला ग्रेनेड स्फोट
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

जम्मूच्या बस स्टँडवरील गुरुवारी झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे.

गुरुवारी बस स्टँडवर झालेल्या हल्ल्यात उत्तराखंडचा तरुण मोहम्मद शारिक मृत्युमुखी पडला होता. तसंच ३२ जणांनी इजा झाली होती.

त्या जखमींपैकीच एका 32 वर्षीय व्यक्तीचं शुक्रवारी निधन झालं. "सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या दवाखान्यात मोहम्मद रियाझ यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. ते अनंतनाग जिल्ह्यातल्या मट्टन गावात राहत होते," असं अधिकाऱ्यांनी PTI वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

घटनेच्या काही तासांच पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. हिजबुल मुजाहिदीननं हा हल्ला घडवून आणण्याची जबाबदारी त्याला दिली होती, असं पोलिसांनी म्हटलं होतं.

जम्मूचे M. K. सिन्हा यांनी सांगितलं होतं की, "कुलगाम येथील यासिर जावेद भट याला हिज्बुलचा कुलगाम जिल्हा प्रमुख फारुख अहमद भट उर्फ उमर यानं हल्ला करण्याचं काम सोपवलं होतं."

भट ग्रेनेड घेऊन गुरुवारी सकाळी जम्मूला पोहोचला होता. घटनेनंतर तो पळून जायच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला नागरोटा इथं अटक केली.

जम्मू येथील बसस्टँडवर झालेला ग्रेनेड हल्ला का मे महिन्यानंतरचा तिसरा हल्ला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर ३ आठवड्यांनी हा हल्ला झाला आहे.

हल्ला झाला, ते ठिकाण

फोटो स्रोत, Mohit Kandhari

फोटो कॅप्शन, हल्ला झाला, ते ठिकाण

शशी कुमार नावाच्या एका प्रत्यक्षदर्शीने मोहित कंधारी यांना सांगितलं होतं, "आमची इथे फळांची हातगाडी आहे. खूप जोरदार स्फोट झाला. कुणी म्हणालं टायर फुटला तर कुणी म्हणालं की बाँबस्फोट झाला. मग कळलं की काही लोक जखमी झाले आहेत."

"आम्ही त्यांना ताबडतोब गाडीत टाकलं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं. तोवर पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते."

जम्मू बस स्टँडवर झालेला ग्रेनेड स्फोट

फोटो स्रोत, AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, जम्मू बस स्टँडवर झालेला ग्रेनेड स्फोट

जम्मू विभागाच्या पोलीस महानिरिक्षकांनी सांगितलं होतं की, काही संशयितांनी नवीन बस स्टँडवर उभ्या असलेल्या एका बसच्या बाहेर ग्रेनेड फेकल. ज्यात बस बाहेर उभे असलेले लोक जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यात पंजाब रोडवेजच्या बसचं नुकसान झालं आहे. या बसमध्ये बसलेले काही प्रवासी जखमी झाले आहेत. त्याशिवाय आजूबाजूचे काही लोकही जखमी झाले आहेत.

नकाशा

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)