अयोध्या वाद, नारायण राणे, इंदुरीकर महाराज, SpaceX मोहीम – वाचा बीबीसी राऊंड-अप

फोटो स्रोत, Getty/YOUTUBE/SRIRAMPANCHU.COM
अयोध्या वाद सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नेमली मध्यस्थ समिती
रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणाचा वाद मध्यस्थाच्या मार्फत सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती खलीफुल्ला हे या समितीचे प्रमुख असतील. तर सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर हे मध्यस्थाची भूमिका बजावतील.
तीन सदस्यीय समितीला पुढच्या आठ आठवड्यात आपला रिपोर्ट सुप्रीम कोर्टासमोर सादर करावा लागणार आहे.
तसंच समितीतील सदस्यांनी या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी जी काही चर्चा होईल ती गोपनीय ठेवण्याचा आदेशही सुप्रीम कोर्टाने दिला आहे. याबाबत अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनांमध्ये महिलांवर टीका का होते?
निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज हे नाव आता घरोघरी ओळखीचं झालं आहे. खेडोपाड्यात कीर्तनं करून हसत हसत लोकांना चार आध्यात्मिक गोष्टी सांगणारे इंदुरीकर महाराज युट्यूबमुळे शहरांमध्येही पोहोचले आहेत.

फोटो स्रोत, KIRAN GUJAR
पण त्यांच्या कीर्तनातील अनेक वक्तव्यं ही महिलांचा अपमान करणारी असतात, असा आक्षेप महिलांनीच नोंदवला आहे. या आक्षेप घेणाऱ्या महिला कोण आहेत, त्यांचे आक्षेप काय आहेत, त्यावर इंदुरीकर महाराजांचं काय मत आहे, हे सारं काही आपण पुढे पाहणार आहोतच.
इंदुरीकर महाराज कोण आहेत, याविषयीही आपण सविस्तर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
शिवसेनेच्या विरोधात उमेदवार देणार, भाजपच्या नाही - नारायण राणे
लोकसभा निवडणुकांची घोषणा अगदी काही तासांवर आली आहे. सर्वच नेते निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. शिवसेना भाजप युतीनंतर खासदार नारायण राणे यांची भूमिका काय याची उत्सुकता वाढली आहे.

बीबीसी मराठीला नारायण राणे यांनी सर्वप्रथम मुलाखत दिली. यामध्ये स्वाभिमान पक्षाचे उमेदवार हे भाजपविरोधात न देता शिवसेनेविरोधात देणार असल्याचा मोठा खुलासा नारायण राणे यांनी केला आहे.
त्याचबरोबर भाजप हा सहयोगी पक्ष असला तरी जी कामं फडणवीस सरकारने केली नाहीत त्यावर निश्चितच भाजपला टीकेचं लक्ष्य करणार असल्याचही ते म्हणाले. बीबीसीशी साधलेल्या संवादात नारायण राणे काय म्हणाले? ते इथं वाचा.
स्पेसएक्सचं ड्रॅगन कॅप्सुल पृथ्वीवर परतलं
अमेरिकेच्या नवीन अंतराळवीरांना अवकाशात नेण्यासाठीचं नवीन कॅप्सुल यशस्वरीत्या परत आलं आहे. प्रात्याक्षिकांसाठी प्रक्षेपित करण्यात आलेलं हे कॅप्सुल अटलांटिक महासागरात उतरलं आहे.

फोटो स्रोत, NASA
स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सुलने इंटरनॅशनस स्पेस स्टेशन सोडल्यानंतर पृथ्वीच्या वातावरणात परत येताना उच्च तापमानाचा सामना करण्यासाठी या कॅप्सुलला हीटशिल्ड बसवण्यात आल्या आहेत. कसं होतं हे यान? आणि काय होती ही मोहीम? वाचा इथे.
रशियातील इंटरनेट 1 एप्रिलपासून बंद होणार?
सगळ्या जगापासून रशियाला अलिप्त ठेवणारा 'पोलादी पडदा' पुन्हा एकदा वेगळ्या रूपात या देशात येऊ पाहत आहे.
इंटरनेटच्या महाजालापासून आपल्या देशाला 'अनप्लग' करण्याची रशियाची योजना असून येत्या काही दिवसांत सरकार त्यासंबंधीच्या प्राथमिक चाचण्याही सुरू करेल.

फोटो स्रोत, Getty Images
रशिया इंटरनेटपासून कधी तुटणार याची तारीख अजून निश्चित झाली नसली तरी 1 एप्रिलपूर्वी रशियन सरकार ही योजना अंमलात आणेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. डिजिटल इकॉनॉमी नॅशनल प्रोग्राम या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी ही शेवटची तारीख आहे. याबाबत अधिक वाचा.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















