नीरव मोदी, रफाल फाईल, अयोध्या राममंदिर वि. बाबरी मशीद, राज ठाकरे: बीबीसी मराठी राउंड अप

एन राम
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

बीबीसी मराठीवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:

1. रफाल : एन. राम म्हणतात, 'द हिंदूनं कागदपत्रं चोरली नाहीत'

"संरक्षण मंत्रालयाशी संबंधित वार्तांकन करताना आम्ही कोणतीही कागदपत्रं चोरलेली नाहीत," असं 'द हिंदू' या माध्यम समूहाचे चेअरमन एन. राम म्हणाले.

राम यांनी रफाल विमान खरेदी व्यवहारासंदर्भात सातत्याने वार्तांकन केलं आहे. मोदी सरकारच्या काळात विमानांची वाढलेली किंमत, या व्यवहारात दसॉ या फ्रेंच कंपनीशी पंतप्रधान कार्यालयाने केलेली समांतर चर्चा, असे मुद्दे त्यांनी शोधपत्रकारिता करून पुढे आणले आहेत.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक पैलूंवर चर्चा केली. वाचा ती सविस्तर मुलाखत इथे .

2. 'हवाईहल्ल्यात 10 जरी पाकिस्तानी मारले असते तर अभिनंदन परतले असते?'

"भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रभक्ती शिकवणारे कोण? जर मोदी राष्ट्रभक्त असते तर नवाज शरीफ यांना केक भरवण्यासाठी गेले नसते," अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली.

राज ठाकरे यांचे आरोप म्हणजे "वैफल्यग्रस्त व्यक्तीची बडबड", अशी टीका भाजपने केली आहे.

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

"अभिनंदन वर्तमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्यानंतर अमित शाह यांनी हवाईहल्ल्यात 250 ठार झाल्याचं म्हटलं, ते काय को-पायलट होते का?" असा सवालही त्यांनी केला.

तसंच "पुलवामासारखा आणखी एक हल्ला ऐन निवडणुकीत घडवून आणतील," असंही ते यावेळी म्हणाले. ही संपूर्ण बातमी सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

3. 'नीरव मोदी, तुम्ही लंडनमध्ये कुठं राहता?'

पंजाब नॅशनल बँकेत जवळजवळ 13,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले हिरे व्यापारी नीरव मोदी 'द टेलेग्राफ'ला लंडनमध्ये दिसले.

मोदी यांनी शहामृगाच्या चमड्यापासून (Ostrich hide) बनवलेलं जॅकेट घातलं होतं, ज्याची किंमत जवळपास 10 लाख रुपये सांगितली जात आहे.

नीरव मोदी

फोटो स्रोत, Getty Images

'द टेलिग्राफ'नं नीरव मोदी यांना काही प्रश्न विचारले आणि संबंधित बातमी ट्वीट केली आहे. काय म्हणाले मोदी? वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

4. जैश-ए-मोहम्मद, जमात उद दावावरील पाकिस्तानची कारवाई आणि वस्तुस्थिती

दहशतवादविरोधी कारवाईचा एक भाग म्हणून पाकिस्तानने गेल्या काही दिवसांत कट्टरतावादी संघटनांशी निगडित अनेक इमारती, मदरसे, प्रशिक्षण तळ आणि काही लोकांना ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे.

'जैश ए मोहम्मद'चा संस्थापक मसूद अजहर याला प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याबरोबर त्याच्या अनेक नातेवाईकांनाही ताब्यात घेतलं आहे.

जैश ए महम्मद

फोटो स्रोत, Getty Images

मात्र इस्लामाबादच्या एका मदरशाकडे फारसं कुणाचं लक्ष गेलेलं नाही. 2016 पासून मसूद अजहर इथे सुरक्षित कैदेत आहे. एवढं असूनही तो आपल्या समर्थकांसाठी ऑडिओ मेसेज जारी करतो.

पाकिस्तानची नेमकी अडचण काय आहे की ते कट्टरतावाद्यांवर कडक कारवाई करू शकत नाही? अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

5. अयोध्या वाद कसा बनला एक राष्ट्रीय मुद्दा?

"या खटल्यातील काही मुद्दे कायद्याच्या मार्गाने सुटतील का, याबद्दल आम्हाला शंका वाटते." - अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने 30 वर्षांपूर्वी 7 नोव्हेंबर 1989ला एक आदेश देताना, ही संक्षिप्त आणि गर्भित टिप्पणी केली होती. बाबरी मशीद परिसरात शिलान्यास होण्यापूर्वी हायकोर्टाने ही टिप्पणी केली होती.

राम जन्मभूमी

फोटो स्रोत, Getty Images

1990चं दशक उजाडताना देशात लोकसभा निवडणूक होणार होती. विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर जन्मभूमीचं आंदोलन जोरात सुरू केलं होतं. फैजाबाद न्यायालयाने मंदिरात ठेवलेल्या मूर्तींची पूजा करण्यासाठी मशिदीचं टाळं उघडण्याची परवानगी दिली होती.

आणि टीव्हीवर होत असलेल्या प्रसारणामुळे हा राष्ट्रीय मुद्दा बनला होता. पण त्यावरील राजकारणाला आज कसं देशात निवडणुकांसाठी आणि सामाजिक धोरणांसाठी महत्त्व प्राप्त झालं आहे? जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)