शरद पवारांची निवडणुकीतून माघार, नातू पार्थ पवार लोकसभेच्या रिंगणात : बीबीसी मराठी राऊंड अप

शरद पवार

फोटो स्रोत, Facebook

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

बीबीसी मराठीवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे:

1. शरद पवारांचा यूटर्न, पार्थ पवार लोकसभा लढणार

शरद पवारांनी ही लोकसभेची निवडणूक न लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं की, एकाच कुटुंबातून तिघांनी निवडणूक लढवू नये, म्हणून मीच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचवेळी पार्थ पवार मावळ मधून निवडणूक लढवणा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

शरद पवारांनी काही आठवड्यांपूर्वीच म्हटलं होतं की ते लोकसभेची निवडणूक लढवू शकतात. पण आता त्यांनी पुन्हा यू-टर्न घेतला आहे. ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

2. राज ठाकरे ते उद्धव ठाकरे: मनसे आमदार शरद सोनवणे आता शिवबंधनात

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दादरमध्ये शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हातून ते शिवबंधनात अडकले.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, BBC/Rahul Ransubhe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्त येत्या निवडणुकीत पुन्हा आक्रमकपणे सरकारविरोधात भूमिका कशी घेऊ, हे स्पष्ट केलं.

पण दोनच दिवसांनंतर सोमवारी मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली. ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

3. सुजय विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित?

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली असली तरी काही जागांचा तिढा अद्याप कायम आहे.

सुजय विखे पाटील

फोटो स्रोत, facebook

नगर दक्षिणची जागा त्यांपैकीच एक. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या या जागेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी दावा सांगितला असून या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते थेट भाजपच्या वाटेवर आहेत. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याासाठी येथे क्लिक करा.

4. Surf Excelच्या जाहिरातीची होळीआधीच धुलाई का सुरू आहे?

होळी रंगांचा उत्सव आहे. या रंगानं आपण नाराजी, द्वेष आणि भेदभावाला विसरून एकमेकांना प्रेमानं रंग लावतो. काही दिवसातच होळीचा सण साजरा केला जाणार आहे. बाजारात सध्या विविध रंग दिसत आहेत.

एकीकडं होळीची तयारी होत आहेत तर दुसरीकडं याच मुद्द्यावरून कपडे साफ करणारी पावडरची कंपनी Surf Excel चर्चेत आली आहे.

सर्फ

फोटो स्रोत, You tube

तसं पाहिलं तर होळीमध्ये कपडे रंगल्यानंतर या वाँशिंग पावडरची आठवण आली असती. पण यावेळेस मात्र हे उत्पादन आणखी एका कारणासाठी चर्चेत आलं आहे.

सोशल मीडियावर #BoycottSurfExcel हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होत आहे. पण का? हे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

5. इथियोपिया अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

इथियोपियातील अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स शोधण्यात सोमवारी यश आलं आहे. रविवारी झालेल्या अपघातामध्ये 157 ठार झाले होते, यात 149 प्रवाशी आणि 8 कर्मचारी यांचा समावेश होता.

इथिओपिया

फोटो स्रोत, Getty Images

हा अपघात स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी 8.44 वाजता झाला. मृतांत 32 केनियन, 18 कॅनडेयिन, 8 अमेरिकन, 4 भारतीय आणि 6 ब्रिटिश नागरिकांचा समावेश आहे. ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)