अडवाणींचं नाव कापलं : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या यादीत नरेंद्र मोदी, अमित शाह - बीबीसी मराठी राऊंड-अप

भाजप

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

बीबीसी मराठीवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा राऊंड-अप

1. अडवाणींचं नाव कापलं : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची यादीत नरेंद्र मोदी, अमित शाह

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. यात 182 उमेदवारांचा समावेश आहेत. अपेक्षप्रमाणे वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा उभे राहणार आहेत. विशेष म्हणजे ज्या गांधीनगर मतदारसंघातून लालकृष्ण अडवाणी निवडणूक लढवायचे त्या मतदारसंघातून अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सविस्तर बातमी इथं वाचा.

2. काँग्रेसचे रत्नागिरीचे उमेदवार बांदिवडेकर का सहभागी झाले होते सनातन संस्थेच्या मोर्चात?

काँग्रेसनं रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभेच्या मतदारसंघासाठी नविनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे. नविनचंद्र यांचा सनातन संस्थेशी संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा.

3. लोकसभा 2019 : 'रणजितसिंह मोहिते पाटील विचारतात 'राष्ट्रवादीनं आम्हाला का डावललं?'

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला का डावललं, याचं उत्तर द्यावं असं म्हटलं आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील

फोटो स्रोत, Facebook

बीबीसी मराठीला रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिलेली विशेष मुलाखत वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

4. इरोम शर्मिला आता सैन्याच्या विशेषाधिकाराविरोधात काश्मीरमध्ये लढा.

मणिपूरप्रमाणेच काश्मिरातही अफ्सा कायदा लागू आहे. म्हणूनच तिथे मानवाधिकारांचं सर्वाधिक उल्लंघन होतं असं इरोम शर्मिला यांचं म्हणणं आहे. त्यांना काश्मीरमध्ये अनाथालय सुरू करायचं आहे.

इरोम शर्मिला

सैन्याला मिळालेल्या विशेषाधिकाराविरोधात उपोषणाचं हत्यार परजणाऱ्या इरोम शर्मिला आता काय करतात? कुठे असतात त्या? सविस्तर वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

5. सांगली : बालेकिल्ला काँग्रेसच लढवणार की राजू शेट्टींसाठी सोडणार

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेसला उमेदवार मिळत नसल्याची स्थिती आहे. शक्यता अशीही आहे की त्यालाच विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील करेल. सविस्तर बातमी विश्लेषण इथं वाचा.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)