CJI रंजन गोगोई चौकशी प्रकरण : न्यायमूर्ती रमणा यांच्या जागी इंदू मल्होत्रा यांची नियुक्ती

फोटो स्रोत, Getty Images
रंजन गोगोई यांच्याविरोधातल्या लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी करणाऱ्या समितीत न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा जागी इंदु मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गोगोई यांच्याविरोधातील आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीत एन. व्ही. रमणा यांचा समावेश होता.
"रमणा हे सरन्यायाधीशांच्या जवळचे आहेत," असा आक्षेप सर्वोच्च न्यायालयाच्या जूनियर असिस्टंट यांनी नोंदवला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःला समितीपासून वेगळं केलं होतं.
"रमणा हे सरन्यायाधीशांचे जवळचे मित्र आहेत आणि घरातल्या सदस्यासारखे आहेत," असं या महिलेनं म्हटलं होतं.
गोगोई यांच्याविरोधातल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मंगळवारी एस. ए बोबडे, एन. वी रमणा आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या पीठाची स्थापना करण्यात आली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)















