लोकसभा निवडणुकीत मोदींना महिलांनी का मतं दिली?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, संजय कुमार
- Role, राजकीय विश्लेषक
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
2019 च्या निवडणुका अनेक अंगांनी पाहता येतात. मात्र काही तज्ज्ञ मोदींच्या विजयासाठी महिलांची मतं हेही एक महत्त्वाचं कारण असल्याचं सांगतात.
अनेक लोकांचं असं मत आहे की महिलांनी या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावलीच तसंच मोठ्या संख्येने भाजपला मतं दिली.
मोदी सरकारच्या लोकप्रिय उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महिलांना गॅस सिंलिंडर मिळाले. अनेक जाणकारांच्या मते यामुळेच महिलांनी भाजपला दिलेल्या समर्थनात वाढ झाली.
महिला- पुरूष संख्येचा फरक कमी
निवडणुकीनंतर झालेल्या सर्वेक्षणातून असं कळतं की उज्ज्वला योजनेचा फायदा 34 टक्के कुटुंबीयांना झाला आहे. ही योजना मोदी सरकारची आहे याची कल्पना एका मोठ्या गटाला होती.
त्यामुळेही कदाचित महिलांनी यावेळी अधिक प्रमाणात मतदान केलं. मात्र या योजनेचा लाभ घेणारेच सत्ताधारी पक्षाला मतं देतात असंही ठामपणे सांगता येणार नाही.
निवडणुकीनंतर CSDS संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार असे संकेत मिळतात की भाजपला मतं देणाऱ्या महिला आणि पुरुष मतदारांच्या संख्येतला फरक कमी झाला आहे. मात्र भाजप अजूनही महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्येच जास्त लोकप्रिय आहे.

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी 37 टक्के होती. त्यापैकी महिलांचं प्रमाण 36 टक्के होतं. तसंच पुरुष मतदारांपैकी 39 टक्के मतदारांनी भाजपची निवड केली.
हे फक्त या निवडणुकीपुरतं मर्यादित नाही. भाजप पुरुषांपेक्षा महिलांमध्ये लोकप्रिय आहे. 2004 नंतर झालेले लोकसभेतील निवडणुकीचे आकडे हेच दर्शवतात.
हा ट्रेंड बऱ्याच ठिकाणी दिसत असला तरी काही प्रदेश यासाठी अपवाद आहे. गुजरात, कर्नाटक, आसाम आणि उत्तर प्रदेशात, भाजपला पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त मतं मिळाली. भाजपचा प्रभाव असलेल्या इतर सर्वं प्रदेशात भाजपला मतं देणाऱ्यांमध्ये पुरुष आघाडीवर होते.

फोटो स्रोत, Getty Images
महिलांच्या मतदानात वेगवेगळे ट्रेंड दिसतात त्यात कोणत्याही पक्षाला विरोध नाही किंवा कोणत्याही विशिष्ट पक्षाची बाजू घेतलेली नाही. पश्चिम बंगाल इथे अपवाद आहे. तिथे महिलांची पसंती ममता बॅनर्जींनाच आहे.
2019 मध्ये महिलांनी कोणत्या पक्षाला मत दिलं?
महिलांच्या सहभागाची पद्धत बदलली
महिलांची मतदानाची पद्धत 2019 च्या निवडणुकीत कमी अधिक प्रमाणात आधीसारखीच होती. मात्र महिलांच्या सहभागाच्या पद्धतीत बदल झाला आहे हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. महिला आणि पुरुषांनी समान संख्येने या निवडणुकीत मतदान केलं.
2019 मध्ये एकूण 66.8 टक्के मतदान झालं. 66.8 टक्के पुरुष मतदानासाठी बाहेर पडले आणि महिलांची टक्केवारीही तितकीच होती.
महिला आणि पुरुषांना मतदानाचा अधिकार एकाच वेळी मिळाला. मात्र निवडणुकीत महिलांची मतदानाची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेत कमी होती. स्वातंत्र्यानंतर हे अंतर 12 ते 14 टक्के होतं. 2004 मध्ये हे अंतर 9 ते 10 टक्क्यांवर आलं.

फोटो स्रोत, EPA
2009 मध्ये त्यात चार टक्क्यांची घट झाली. 2014 मध्ये हे अंतर 1.6 टक्के उरलं. 2019 मध्ये हे प्रमाण समसमान राहिलं आहे.
अरुणाचल प्रदेश, बिहार, गोवा, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, नागालँड, ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड आणि उत्तराखंड या प्रदेशात महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त मतदान केलं आहे.
इतकंच नाही तर सध्याच्या लोकसभेत 78 महिला खासदार आहेत. भारताच्या इतिहासात हा आकडा सर्वाधिक आहे. 2019 च्या निवडणुकीत या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आणि सकारात्मक आहेत. मात्र महिलांच्या संसदेतील प्रतिनिधित्वाशी निगडीत अन्य प्रश्नांवर विचार करण्यासाठी आणखी पुढे जाण्याची गरज आहे.
लोकसभा निवडणुकीतील राज्यनिहाय मतदानाची टक्केवारी (महिला आणि पुरुष)
(लेखक हे प्राध्यापक आणि Centre for the Study of Developing Societies (CSDS) संस्थेचे संचालक आहेत. लेखात व्यक्त केलेली मतं लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत. हा लेखातील तथ्य आणि मतं बीबीसीचीनाहीत आणि बीबीसी या आकड्यांसाठी जबाबदार नाही.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)



















