‘पंजाबमध्ये 90 हजार प्रवासी, केंद्रानं मदत नाही केली तर उद्रेक होईल'

देशभरात सतर्कता

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, देशभरात सतर्कता
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

पंजाबमध्ये या महिन्यातच तब्बल 90 हजार अनिवासी भारतीय दाखल झाले असून त्यांच्यामुळे करोना व्हायरस संक्रमणाचा धोका वाढला आहे.

केंद्र सरकारने तातडीने आवश्यक ती वैद्यकीय मदत आणि दीडशे कोटींचे अर्थसहाय्य पंजाब सरकारला करावं, असं पत्र पंजाब सरकारच्या आरोग्य मंत्र्यांनी केंद्र सरकारला लिहिलं आहे.

पंजाबचे आरोग्य मंत्री बलबीर सिंग संधू यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना सोमवारी याबाबतीत पत्र पाठवून पुढील धोक्याचा इशारा दिला आहे.

कोरोना
लाईन

पंजाबच्या आरोग्य मंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की,

"या महिन्यातच पंजाबमध्ये 90 हजार अनिवासी भारतीय दाखल झाले आहेत. त्यातील अनेकांमध्ये कोव्हीड-19 ची लक्षणं आढळून आली आहेत.

करोना व्हायरस संक्रमण झालेल्या अशा अनेक व्यक्ती हे संक्रमण पुढे पसरवत आहेत. कोव्हीड-१९च्या रुग्णांची संख्या धोकादायकरीत्या वाढू शकण्याची चिन्ह आहेत.

पंजाब सरकारने याचा सामना करण्यासाठी कडक नियोजन केलं आहे. सरकारतर्फे ICU आणि आयसोलेशन वार्ड उभारले जात आहेत. असं असलं तरी आम्हाला मोठ्या प्रमाणावर अधिकचं मनुष्यबळ, भूलतज्ज्ञ, पल्मोनॉलॉजिस्ट, डॉक्टर्स, नर्सेस यांची गरज भासणार आहे.

याशिवाय औषधी, वैद्यकीय साहित्य, व्हेंटिलेटर्स यांची मोठ्याप्रमाणावर गरज भासणार आहे.

या आरोग्य संकटाचा सामना करण्यासाठी आणि योग्य नियोजन करण्यासाठी आम्हाला केंद्र सरकारकडून पंजाब सरकारला किमान दीडशे कोटींचा अतिरिक्त निधी लागणार आहे."

राज्यातील वैद्यकीय सुविधांच्या बळकटीकरणासाठी तातडीने केंद्र सरकारने ही मदत करावी, असंही या पत्रात म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)