मुंबईच्या सिटी सेंटर मॉलला लागलेली आग 10 तासांनंतरही धगधगतीच

आग

फोटो स्रोत, BMC

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

मुंबई सेंट्रलमधल्या मुंबई सेंट्रल बस स्थानकाच्या जवळ असलेल्या सिटी सेंटर मॉलला काल (22 ऑक्टोबर) रात्री सुमारे 8 वाजून 53 मिनिटांनी आग लागली.

ही माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलानं घटनास्थळी अग्निशमन वाहनं रवाना केली. मोठ्या प्रमाणावर आग पसरल्याने, पहाटे 2 वाजून 41 मिनिटांनी ही आग ब्रिगेड कॉल स्तराची अग्निशमन दलाने घोषित केली.

सिटी सेंटर मॉल तळमजला अधिक तीन मजले स्वरूपाची इमारत आहे. या ठिकाणी प्रारंभी दुसऱ्या मजल्यावर आग लागली. या मजल्यावर मोबाईल, प्रिंटर, स्टेशनरी, फर्निचर आणि इतर साहित्यांचे गाळे आहेत.

या गाळ्याना ही आग लागल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर ही आग तिसऱ्या मजल्यावरही पसरली असल्याचं लक्षात आलं.

मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला आग

फोटो स्रोत, BMC

आग विझवण्यासाठी 24 फायर इंजिन, 16 जंबो टँक यांच्यासह एकूण 50 अग्निशमन वाहनं तैनात आणि कार्यरत आहेत. 250 अधिकारी आणि कर्मचारी आग विझवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार अमीन पटेल, महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकानी यांनी रात्री उशिरा भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती जाणून घेतली.

सिटी सेंटर मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव या सुमारे 55 मजली इमारतीमधल्या अंदाजे 3500 रहिवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन जवळच असलेल्या मैदानामध्ये त्यांना स्थलांतिर करण्यात आलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यामध्ये वाहतूक आणि इतर बाबींमध्ये मदतीसाठी पोलिसांची देखील मदत घेतली जात आहे. सिटी सेंटर मॉल आगीची तीव्रता लक्षात घेता बेलासिस रोडवरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)