दोन गाड्या OLX वर तब्बल 14 वेळा विकणाऱ्याला चोराला अटक

कार चोर

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

गाड्यांची ऑनलाईन विक्री करून मग त्या चोरून पुन्हा विकणाऱ्या एका व्यक्तीला नोयडा पोलिसांनी अटक केलीय. या माणसाने OLX वर 14 वेळा आतापर्यंत गाड्या विकल्या आहेत.

मनू त्यागी नावाच्या या इसमाने त्याच्या मित्राच्या वॅगन - आर गाडीसह आणखी एक कार OLX वर 14 वेळा विकली.

हा माणूस वॅगन आर आणि स्विफ्ट डिझायर गाडी विकण्यासाठीची जाहिरात OLX वर पोस्ट करत असे.

त्यासाठी ग्राहक मिळाल्यावर तो या गाडीचा व्यवहार करे, पण गाडीची डिलीव्हरी करण्यापूर्वी गाडीत GPS ट्रॅकर लावत असे. विक्री केल्याच्या काही काळानंतर तो या ट्रॅकरच्या मदतीने कारचा मागोवा घेई आणि दुसरी चावी वापरत कार चोरत असे.

चोरी केलेल्या या कारला खोटी नंबरप्लेट लावून पुन्हा या गाडीची विक्री ऑनलाईन करण्यात येई.

मार्चमध्ये मनू त्यागीने एका कार डीलरला असाच चुना लावला. त्याने या कारची विक्री केली, गाडी त्याला दिली आणि त्याच रात्री त्याच्या घरून गाडी चोरली.

कार चोर

फोटो स्रोत, Getty Images

पण या कार डीलरच्या मित्राने याच कार विक्रीसाठीची जाहिरात ऑनलाईन पाहिली आणि बिंग फुटलं.

आपण लोकांना त्याच त्याच गाड्या विकून फसवलं असल्याचं या व्यक्तीने चौकशीत मान्य केल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

खोटी नंबर प्लेट असणारी वॅगन आर, दोन मोबाईल फोन्स, खोटं पॅन कार्ड आणि रोख रक्कम या इसमाकडून जप्त करण्यात आलेली आहे.

जवळपास सात प्रकरणांमध्ये पोलीस या मनू त्यागीचा शोध घेत होते. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही यापूर्वी दाखल झालेला आहे. तर फसवणुकीची 5 प्रकरणंही आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)