क्लेयर पोलोसाकः टेस्ट मॅचमध्ये अंपायरिंग करणाऱ्या पहिल्या महिला अंपायर तुम्हाला माहिती आहेत का?

क्लेयर पोलोसाक: सिडनी टेस्टमध्ये महिला अंपायर

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी इथं सुरू झालेल्या तिसऱ्या टेस्टदरम्यान क्लेयर पोलोसाक या पुरुषांच्या क्रिकेटमध्ये, टेस्ट मॅचमध्ये अंपायरिंग करणाऱ्या पहिल्या महिला अंपायर ठरल्या.

144 वर्षांच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अंपायरची पुरुषांच्या टेस्ट मॅचसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोना नियमावलीमुळे आयसीसीने तटस्थ पंचांच्या व्यवस्था शिथिल करत ज्या देशात मॅच असेल त्याच देशातल्या अंपायर्सची नियुक्ती करण्यात येते आहे.

सिडनी टेस्टसाठी क्लेयर या फोर्थ अंपायर आहेत. 32 वर्षीय क्लेयर यांच्याकडे फोर्थ अंपायर म्हणून पिच सुस्थितीत ठेवणे, मॅचसाठी आवश्यक उपकरणं पुरवणे, ऑन फिल्ड अंपायर्सना साहाय्य करणे या जबाबदाऱ्या आहेत.

ऑन फिल्ड अंपायर्सपैकी कोणी दुखापतग्रस्त किंवा आजारी पडल्यास क्लेयर या थर्ड अंपायरच्या भूमिकेत दिसू शकतात.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात वर्ल्ड क्रिकेट लीगमधील नामिबिया आणि ओमान यांच्यातील पुरुषांच्या मॅचदरम्यान त्यांनी अंपायरिंग केलं होतं.

डिसेंबर 2018 मध्ये क्लेयर आणि एलोइस शेरिडान यांनी ऑस्ट्रेलियातील महिलांच्या बिग बॅश ट्वेन्टी-20 स्पर्धेत अॅडलेड स्ट्रायकर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यातील मॅचदरम्यान अंपायरिंग केलं होतं.

2017 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या डोमेस्टिक क्रिकेटमधल्या न्यू साऊथ वेल्स आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन यांच्यातल्या वनडे मॅचदरम्यान क्लेयर यांनी अंपायरिंग केलं होतं.

2016 मध्ये भारतात झालेल्या महिला ट्वेन्टी-20 वर्ल्डकपमध्ये क्लेयर आणि न्यूझीलंडच्या कॅथी क्रॉस यांनी अंपायरिंग केलं होतं.

ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या क्लेयर गेल्या वर्षी मायदेशात झालेल्या महिला ट्वेन्टी-20 वर्ल्डकपसाठीच्या अंपायरिंग पॅनेलमध्ये होत्या.

क्लेयर आयसीसीच्या डेव्हलपमेंट अंपायर पॅनेलचा भाग आहेत. क्लेयर यांनी आतापर्यंत महिलांच्या 17 वनडेत तसंच 33 ट्वेन्टी-20 मॅचमध्ये अंपायरिंग केलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)