अमेरिका : मायकेल चक्रीवादळ फ्लोरिडात धडकणार

वादळ

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

मायकेल चक्रीवादळाची तीव्रता आता वर्ग तीनपर्यंत पोहोचली आहे. 230 किमी प्रति तास वेगानं ते अमेरिकेतल्या फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर धडकत असल्याचं नॅशनल हरिकेन सेंटर (NHC) नं म्हटलं आहे.

बुधवारी या वादळामुळे भूस्खल्लन होण्याची शक्यता असून या वादळामुळे मध्य अमेरिकेत 13 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

फ्लोरिडाच्या किनारी भागातल्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा गव्हर्नर स्कॉट यांनी दिला आहे. ते म्हणाले, "हा तुमच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो."

या वादळाच्या पार्श्वभूमीवर अलाबामा राज्यात आणीबाणी घोषित झाली आहे. तसंच दक्षिण जॉर्जियाच्या 92 आणि फ्लोरिडातल्या 35 विभागांमध्ये सुद्धा आणिबाणी घेषित करण्यात आली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते अमेरिकेतल्या काही भागात 12 इंच पावसाची शक्यता आहे. तर वादळाची उंची 12 फुटांपर्यंत वाढू शकते.

"बुधवारी हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फ्लोरिडा पॅनहॅंडल किंवा फ्लोरिडा बिग बेंड भागात भूस्खलन होण्याची शक्यता आहे," असं NHC ने काढलेल्या बुलेटिनमध्ये नमूद केलं आहे.

धोक्याचा इशारा

फ्लोरिडाच्या गव्हर्नरने या वादळाला राक्षसी वादळ संबोधलं आहे तसंच रहिवाशांना अधिकाऱ्यांबरोबर सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

आखाती किनाऱ्यावर भूस्खलन झाल्यावर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यापर्यंत हे वादळ जाण्याची शक्यता आहे.

कॅरोलिनामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. गेल्या महिन्यात आलेल्या फ्लोरेन्स वादळाचाही या भागाला तडाखा बसला होता.

उत्तर कॅरोलिनाचे गव्हर्नर रॉय कूपर यांनी रहिवाशांना सांगितलं, "लोक फ्लोरेन्स वादळामुळे आधीच कंटाळले आहे याची मला कल्पना आहे. तरीसुद्धा या वादळाबाबत तितकंच सजग रहावं."

अमेरिकेतील वादळ

फोटो स्रोत, Getty Images

किनारपट्टीवरील 482 किमी परिसराला सध्या वादळाचा धोका असल्याचं नॅशनल व्हेदर सर्व्हिसचं मत आहे.

प्रशासनानेन अलाबामा आणि फ्लोरिडातल्या रहिवाशांना वादळी वाऱ्यांसह पुराचा इशारा दिला आहे.

अलाबामामधल्या तज्ज्ञांनी वादळाचा इशारा दिला आहे.

आम्ही वादळाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत, असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

गव्हर्नर स्कॉट पत्रकार परिषदे म्हणाले, "या वादळामुळे आपल्या राज्यातल्या काही भागांचं प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. विशेषत: पॅनहँडल भागात हा धोका जास्त असून गेल्या काही दशकांतलं हे सगळ्यांत धोकादायक वादळ असण्याची शक्यता आहे."

फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरील 120,000 लोकांना हा परिसर सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तिथल्या शाळा आणि कार्यालयं या आठवड्यात बंद राहतील.

वादळाच्या वाढत्या तीव्रतेबरोबरच आणखी काही लोकांना सुरक्षितस्थळी जाण्याचा इशारा दिला जाईल, असंही स्कॉट पुढे म्हणाले.

"पाण्याचा प्रवाह पाहता कुणीही वाचण्याची शक्यता नाही," असंही ते म्हणाले.

वादळाला तोंड देण्यासाठी मंगळवारी स्कॉट यांनी फ्लोरिडात 2500 नॅशनल गार्ड ट्रुप्सला पाचारण केलं आहे.

अलाबामा आणि जॉर्जिया या भागांनासुद्धा धोक्याचा इशारा दिला आहे.

मायकेल वादळ कुठे धडकलं आहे?

गेल्या आठवड्याच्या शेवटी मध्य अमेरिकेला खंडाला या वादळाचा सगळ्यांत जास्त तडाखा बसला आहे. तिथे 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. AP या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार होन्डुरासमध्ये सहा, निकारगुआत चार आणि सॅल्व्हाडोरमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे.

सोशल मीडियावरील फोटोनुसार स्थानिक रहिवासी पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

वादळ

फोटो स्रोत, AFP

क्युबाच्या पश्चिम भागालासुद्धा या वादळाचा तडाखा बसला आहे. तिथं 12 इंच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

मेक्सिकोच्या आखातातल्या कामगारांना तिथून हलवण्यात आलं आहे. त्यामुळे तिथलं तेलाचं उत्पादन पाच पटीनं कमी झालं आहे.

US Bureau of Safety and Environmental Enforcement च्या मते वादळाच्या वाटेतून जमीन खणणारी पाच यंत्रं काढून टाकण्यात आली आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)