पाहा व्हीडिओ: ऋषिकेश ते आइसलॅंड : भारतीय तरुणाचा फेसाळता थरारक प्रवास

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ: 'इथलं काम मला आवडतं पण गंगामायची आठवण येते.'
Published

उत्तराखंड राज्यातल्या ऋषिकेशचे प्रमोद मगर यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा आइसलॅंडमध्ये उमटवला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेले प्रमोद हे आज एक आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारे प्रमाणित सेफ्टी कायाकर आहेत. कायाकिंग करून ते राफ्टिंगसाठी आलेल्या पर्यटकांचे सेफ्टी गाईड म्हणून काम करतात.

ऋषिकेशमध्ये असताना ते पर्यटकांना बघूनच रिव्हर राफ्टिंग शिकले. मग जुनी टायर-ट्यूब वापरून ते रिव्हर राफ्टिंग करू लागले आणि नंतर एका रिव्हर राफ्टिंग कॅम्पमध्ये काम करू लागले.

आता त्यांना आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे सेफ्टी कायाकरचं प्रमाणपत्र मिळालं आहे. आणि ते आइसलॅंडमध्ये सेफ्टी गाईडचं काम करतात. ते म्हणतात, "इथलं काम मला आवडतं पण गंगामायची आठवण येते."

पाहा त्यांचा हा प्रेरणादायी आणि थरारक प्रवास.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)