पाहा व्हीडिओ : गाझा पट्टीत किमान 55 पॅलेस्टिनी निदर्शकांचा मृत्यू
Published
अमेरिकेनं आपलं दूतावास तेल अविवहून जेरुसलेमला हलवल्यानंतर निदर्शनांना सुरुवात झाली.
जेरुसलेम ही आमचीच राजधानी आहे, असा दावा इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघांनीही केला आहे. या वादामुळेच अनेक देशांनी आपले इस्रायलमधले दूतावास जेरुसलेममध्ये न ठेवता तेल अविवमध्ये ठेवले आहेत.
पण डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेचा दूतावास जेरुसलेममध्ये हलवला आणि या भागात निदर्शनं सुरू झाली. त्यांना थांबवण्यासाठी इस्रायलकडून गोळीबार करण्यात आला.
यात आतापर्यंत गाझा पट्टीत 55 पॅलेस्टिनी निदर्शकांचा मृत्यू झाला आहे तर 2,700 जण जखमी झाले आहेत.
वाचा पूर्ण बातमी इथे.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)