#पैशाची गोष्ट : अमेरिकेचा गोल्डन व्हिसा तुम्हाला मिळवता येईल पण....

व्हीडिओ कॅप्शन, अमेरिकेचा गोल्डन व्हिसा - कुणाला मिळवता येईल गोल्डन व्हिसा?
Published

पैशाची गोष्टमध्ये आज जाणून घेऊया गोल्डन व्हिसाबद्दल. अमेरिकेत स्थायिक होण्याचं स्वप्न अनेक जण बघतात. त्यासाठी H1-B हा नोकरीची परवानगी देणारा व्हिसा मिळवण्याचा प्रयत्नही सुरू असतो.

त्याचबरोबर अलीकडे अमेरिकेचा गोल्डन व्हिसा घेणाऱ्या भारतीयांची संख्याही वाढत आहे. पण, त्यात एक मेख आहे. H1-B व्हिसा मिळवून तुम्ही अमेरिकेत नोकरी करण्याची परवानगी मिळवता.

गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी तुम्हाला अमेरिकेत कंपनी स्थापन करून तिथल्या किमान दहा जणांना नोकरी द्यावी लागते. अलीकडे भारतात हा व्हिसा मिळवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. जाणून घेऊ या कुणाला मिळतो गोल्डन व्हिसा?

निवेदक - ऋजुता लुकतुके, निर्माती - सुमिरन प्रीत कौर, लेखक - दिनेश उप्रेती, एडिटिंग - परवाझ लोण.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)