काश्मीरमध्ये मिळतं जगातलं सगळ्यांत महागडं मशरूम

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : काश्मिरमध्ये सापडणारे स्पाँज मशरूम सगळ्यात दुर्मीळ आणि महागड्या मशरूम्सपैकी एक आहेत.
Published

काश्मीरमध्ये सापडणारं स्पाँज किंवा मोरेल मशरूम जगातल्या सगळ्या दुर्मीळ आणि महागड्या मशरूम्सपैकी एक आहेत. म्हणून या मशरूमला दर किलोमागे 54,000 रुपये एवढा भाव मिळतो.

पण ही मशरूम्स मिळणं सोपं नाही. काश्मीरच्या डोंगराळ भागातून असं एक मोरेल मशरूम मिळवण्यासाठी कित्येक तास पायपीट करावी लागते.

केवळ काही ग्रॅम मशरूम गोळा करून काश्मिरातले गावकरी तीन- चार महिने पुरतील इवढे पैसे जमा करतात.

निसरड्या कड्यांवर चढून एकेक मशरूम गोळा करावं लागतं, म्हणून या कामात जीवाला धोकाही आहे.

काश्मीरच्या या भागात रोजगार उपलब्ध नसल्याने गावकरी हा धोका पत्कारतात. पाहा हा व्हीडिओ -

रिपोर्टर - योगिता लिमये

शूटिंग आणि एडिटिंग - जाल्टसन ए. सी., विष्णू वर्धन

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)