पाहा व्हीडिओ : ...आणि गाडीतून चक्क 2.8 मीटरचा कोब्रा निघाला!
Published
तुम्ही गाडी चालवताना अचानक डॅशबोर्डच्या खालून एक कोब्रा बाहेर आला तर? विचार करूनही थरकाप उडाला ना?
चीनमध्ये काही असंच झालं असतं. एका मिनीव्हॅनमध्ये किंग क्रोबा दडून बसला होता. त्याला बाहेर ओढण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यानं चिमट्याचा वापर केला. जवळपास 2.8 मीटर लांब आणि 4.1 किलोग्रॅम वजनाचा हा साप होता.
भूतलावरील सर्वाधिक विषारी सापांमध्ये याचा समावेश होतो. स्थानिक वन्यजीव खात्याकडे या सापाला सोपवण्यात आलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)