पाहा व्हीडिओ: सिंगापूरच्या भेटीत किम जाँग-उन यांच्या काय अपेक्षा असतील?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ: सिंगापूरच्या भेटीत किम वाचणार अपेक्षांचा पाढा
Published

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांच्या भेटीकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार याविषयी अंदाज बांधले जात आहेत.

उत्तर कोरियाने आण्विक नि:शस्त्रीकरण करावं अशी अमेरिकेची इच्छा होती. त्यामुळे या त्यागाची परतफेड म्हणून उत्तर कोरिया काहीतरी मागणी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमेरिका उत्तर कोरियात अनेक वर्षं युद्धनौका, युद्धविमानं, सैनिक पाठवत आहे. या प्रकाराला आळा घालण्याची मागणीसुद्धा किम करण्याची शक्यता आहे.

उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था सुधारण्याचं किम जाँग उन यांचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय निर्बंध उठवण्याची मागणी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

किम यांना जागतिक पातळीवर एक महत्त्वाचा नेता म्हणून उदयाला यायचंय, त्यामुळे अमेरिका, रशिया, चीन दक्षिण कोरियासारखीच उत्तर कोरियाला समान पातळीवरची वागणूक मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)