व्हीडिओ : तुर्कस्तानमध्ये एर्डोगनसमोर सत्ता राखण्याचं आव्हान
Published
आज तुर्कस्तानमध्ये संसद आणि अध्यक्षपदासाठी मतदान होत आहे, त्यात 16 वर्षं सत्तेत असलेल्या एर्डोगन यांना यंदा तगडं आव्हान आहे.
तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्डोगन आणि त्यांचा एके हा पक्ष गेली 16 वर्षं अजिंक्य आहे. पण या निवडणुकीत विजयाची ही परंपरा कायम राहील का?
युध्दग्रस्त सीरिया आणि युरोपच्या दरम्यान वसलेल्या तुर्कस्तानात काहीही घडामोड झाली तर त्याचे पडसाद या पूर्ण क्षेत्रात उमटतात. म्हणूनच या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलेलं आहे.
ही निवडणूक एक तर एर्डोगन यांची सत्ता आणखी भक्कम करेल किंवा त्यांना हटवून तुर्कस्तानच्या वाटचालीची दिशा आमूलाग्र बदलून टाकेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)