पाहा व्हीडिओ: इथे निवडणूक लढवायची असेल तर थेट मृत्यूशीच सामना
मेक्सिकोमध्ये रविवारी निवडणूक होत आहे. आतापर्यंत तिथे 48 उमेदवारांची हत्या झाली आहे.
मेक्सिकोत निवडणूक लढवायची म्हणजे मृत्यूचा सामना करण्यासारखं आहे.
सप्टेंबर-2017पासून आतापर्यंत 130 राजकीय नेत्यांची हत्या झाली आहे. त्यापैकी 48 जण 1 जुलैला होणाऱ्या निवडणुकीत उमेदवार होते.
रविवार, 1 जुलै रोजी देशातली सगळ्यांत मोठी निवडणूक होत आहे. त्यात राष्ट्राध्यक्ष पदासाठी आणि संसदेसह राष्ट्रीय तसंच स्थानिक पातळीवरील 3400 हून अधिक जागांसाठी मतदान होणार आहे.
मेक्सिकोत 2017 मध्ये सुमारे 30 हजार जणांच्या हत्या झाल्या. या गुन्हेगारीच्या केंद्रस्थानी ड्रग माफिया आहेत.
2018मध्ये तर आणखी रक्तपात झाला आहे. पहिल्या तीन महिन्यांतच सुमारे 8000 खून झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर मेक्सिको रविवारी मेक्सिकोमध्ये निवडणुकीत मतदान होत आहे.
मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतल्या महत्त्वाच्या गोष्टी
- या निवडणुकीत जिंकणारा उमेदवार विद्यमान राष्ट्राध्यक्ष एनरिक पेना निटो यांची जागा घेईल. ते इन्स्टिट्युशनल रिव्हॉलशनरी पार्टीचे आहेत.
- मेक्सिकोत राष्ट्राध्यक्षपदाची मुदत सहा वर्षांचीच असते. त्यामुळे विद्यमान राष्ट्राध्यक्ष पुन्हा निवडून येऊ शकत नाही.
- मतचाचण्यांच्या अंदाजानुसार डाव्या पक्षाचे उमेदवार अँड्रस मॅन्युएल लोपेझ ओब्रेड हे या पदावर निवडून येण्याची जास्त शक्यता आहे.
- त्याचबरोबर डाव्या आणि उजव्या पक्षाच्या युतीचे रिकार्डो अन्या, सत्ताधारी पक्षाचे जोस ओंटोनिओ मेडे आणि अपक्ष जेम रोड्रिंग हे उमेदवारही अध्यक्षपदासाठी स्पर्धेत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)