पाहा व्हीडिओ : फेसबुक तुम्हाला व्यसनाधीन बनवतं आहे का?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ: फेसबुक तुम्हाला व्यसनाधीन बनवत आहे का?
Published

सिलिकॉन व्हॅलीतील सूत्रांनी बीबीसीला सांगितलं की, मोठ्या सोशल मीडिया कंपन्या लोकांना व्यसन लावत आहेत.

त्यामुळे फायदा अर्थातच या कंपन्यांचा होणार आहे. सोशल मीडियामुळे अनेक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अति वापरामुळे निद्रानाश, काळजी, असे अनेक विकार जडतात.

आठवड्याला अगदी 14-14 तास लोक स्मार्टफोन वापरतात. सारखं फेसबुक आणि इन्स्टाग्राम तपासण्यामागे कोणती उर्मी असते हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.

आम्ही लोकांना एकत्र आणतो, त्यांना व्यसन लावण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही असं फेसबुक आणि इन्स्टाग्रामतर्फे सांगण्यात आलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)