व्हीडिओ - हैदराबाद मुक्तिसंग्राम : निजामाचं राज्य कसं झालं भारतात विलीन?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : कसं झालं हैदराबाद मुक्त?
Published

15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला तरी हैदराबाद संस्थानावर निजामाचंच राज्य होतं. या संस्थानात आताचे तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकचे 2 जिल्हे आणि महाराष्ट्रातले 8 जिल्हे म्हणजे संपूर्ण मराठवाड्याचा समावेश होता.

तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानंतर 13 सप्टेंबर 1948ला भारतीय सैन्यानं कारवाई केली.

केवळ तीन दिवसांत हैदराबाद संस्थानातील सर्व महत्त्वाची केंद्रं भारतीय सैन्याच्या ताब्यात होती. अखेर भारत सरकारकडून अटक टाळण्यासाठी निजामानं शरणागती पत्करली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)