पाहा व्हीडिओ : कोकणात दहा हजार वर्षांपूर्वी नेमकं काय चाललं होतं?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : 'कोकणात दहा हजार वर्षांपूर्वी नेमकं काय चाललं होतं?'
Published

कोकणात राजापूर आणि रत्नागिरीच्या काही भागात सपाट जमिनीवर कोरलेली कातळशिल्प आढळली आहेत.

१०,००० वर्षापूर्वीच्या मानवी संस्कृतीनं ही कातळशिल्प नेमकी का कोरली असावीत याबद्दलचं संशोधन सध्या सुरू आहे. या कातळशिल्पांवर प्रामुख्याने प्राण्यांच्या आकृती कोरण्यात आल्या आहेत. अश्मयुग संपल्यानंतर इसवी सन तिसऱ्या शतकापर्यंत कोकणात नेमकं काय सुरू होतं, हे अजूनही गूढ आहे. महाराष्ट्र सरकारच्या सहाय्याने या कातळशिल्पांचा अभ्यास आता सुरू झाला आहे.

बीबीसी न्यूज मराठीसाठी मयुरेश कोण्णूर यांचा रिपोर्ट. निर्मिती - जान्हवी मुळे, शूट आणि एडिट - शरद बढे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)