पाहा व्हीडिओ - मेनोपॉजनंतरही गर्भधारणा होऊ शकते का?
पेरीमेनोपॉजनंतरही महिलेचे अंडाशय चांगल्या स्थितीत असेल तर तिला मूल होऊ शकतं. पण अशा घटना क्वचित घडतात.
एका ठराविक वयानंतर पाळी येणं बंद होण्याला मेनोपॉज म्हणतात. त्यानंतर महिलांमध्ये गर्भधारणा होऊ शकत नाही. हे सहसा वयाच्या पन्नाशीनंतर घडतं. पण अनेकींना त्याआधीही मेनोपॉज येऊ शकतो.
मेनोपॉजच्या आधी पाळी अनियमित होते. रक्तस्रावही कमी होत जातो. अनेकदा तर कित्येक महिने पाळी येतच नाही. याला पॅरीमेनोपॉज म्हणतात.
मेनोपॉजच्याआधी पेरीमेनोपॉज येतो, जो 2-3 वर्षं चालू शकतो. यामध्ये मेनोपॉजचीही लक्षणं दिसू लागतात.
अंग गरम होणं, झोप न लागणं, मूड स्विंग होणं, योनीचा भाग कोरडा पडणं, अशक्तपणा, वजन वाढणं. ही सगळी पेरीमेनोपॉजची लक्षणं आहेत आणि ती मेनोपॉज नंतरही काही काळ राहू शकतात.
मेनोपॉजनंतर गर्भधारणा होत नाही कारण अंडाशयातली अंडी पूर्णपणे नष्ट झालेली असतात. पण पेरीमेनोपॉजनंतरही महिलेचे अंडाशय चांगल्या स्थितीत असेल तर तिला मूल होऊ शकतं. अर्थात अशा घटना क्वचित घडतात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)