पाहा व्हीडिओ : शतकांपूर्वी पॅसिफिक महासागरांतील बेटांवर अशी होती संस्कृती
Published
लंडनच्या रॉयल अकॅडमीमध्ये पॅसिफिक महासागरातल्या बेटांवरील शतकांपूर्वीच्या कलेचं आणि संस्कृतीचं प्रदर्शन भरलं आहे. डचेस ऑफ ससेक्स मेगन मार्कल यांनी या प्रदर्शनाचं उद्धाटन केलं.
या प्राचीन आणि अर्वाचीन खजिन्यामुळे पॅसिफिक महासागरातील बेटांवरील लोकांचे ब्रिटन आणि युरोपमधल्या लोकांशी बंध निर्माण झाल्याचं या प्रदर्शनाच्या आयोजकांचं म्हणणं आहे. या प्रदर्शनात अनेक शतकं जुन्या मरोई कोरीव कामातील कलाकृतींचा समावेश आहे. १८ व्या शतकात कॅप्टन कूकनं पॅसिफिक बेटांवर केलेल्या मोहीमांपासून २०१० साली साच्यातून तयार केलेल्या मानवी चेहऱ्यांपर्यंत अनेक अनोख्या गोष्टी या प्रदर्शनात आहेत.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)